लग्न ठरलं, पण वधू अडकली पाकिस्तानात !
By admin | Published: October 7, 2016 01:00 PM2016-10-07T13:00:01+5:302016-10-07T13:02:00+5:30
भारत - पाकिस्तानमध्ये वाढत चाललेल्या तणावाचा फटका फक्त आर्थिक आणि राजकीय गोष्टींवर होत नसून काही सामान्यांनाही याची झळ बसत आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
जोधपूर, दि. 7 - भारत - पाकिस्तानमध्ये वाढत चाललेल्या तणावाचा फटका फक्त आर्थिक आणि राजकीय गोष्टींवर होत नसून काही सामान्यांनाही याची झळ बसत आहे. दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेल्यामुळे एका राजस्थानी तरुणाचं लग्न अर्ध्यावर लटकलं आहे. कारण त्याची वधू पाकिस्तानची असून व्हिसा मिळत नसल्याने लग्न होणार की नाही या संभ्रामवस्थेत दोन्ही कुटुंब पडली आहेत.
नरेश तिवानी असं या तरुणाचं नाव असून योग्य ती प्रक्रिया पुर्ण केल्यानंतरही वधू प्रिया बच्चानी आणि तिच्या कुटुंबियांना व्हिसा दिला जात नसल्याचं त्याचं म्हणणं आहे. 7 नोव्हेंबरला लग्न होणार असून सर्व तयारी पुर्ण झाली आहे. लग्नाची तारीख पुढे ढकलावी लागते का काय ? याची भीती वाटत असल्याचं नरेश तिवानी बोलला आहे.
लग्नाची तारीख जवळ आली आहे, मात्र पाकिस्तानमधील भारतीय दुतावासाने वधू आणि तिच्या कुटुंबियांना व्हिसा दिलेला नाही. व्हिसा न मिळाल्याने ठरलेल्या तारखेली लग्न होणार की नाही याची चिंता दोन्ही कुटुंबाना लागली आहे. भारतीय दूतावास व्हिसा देत नसून वारंवार फे-या मारायला लावत असल्याचा आरोप केला जात आहे. शेवटी नरेश तिवानीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट करुन मदत मागितली आहे.
नरेश तिवानी आणि कराचीमधील प्रिया बच्चानीचा दोन वर्षापुर्वी साखरपुडा झाला होता. एका मॅट्रिमोनी साईटच्या माध्यमातून दोन्ही कुटुंब एकमेकांच्या संपर्कात आले होते. 2014 मध्ये साखरपुड्यासाठी प्रिया बच्चानी आणि तिचं कुटुंब जोधपूरला आलं होतं. प्रियाच्या वडिलांच्या निवृत्तीपर्यंत लग्न करायचं नाही असं ठरल्याने लग्नाची तारीख लांबली होती.
ऑगस्टमध्ये प्रियाचे वडिल निवृत्त झाल्यानंतर लग्नाची ताऱीख ठरली होती. व्हिसा मिळवण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया पुर्ण केल्या मात्र व्हिसा मिळणार नाही असं कळलं. प्रियाच्या कुटुंबियांनी स्थानिक नेत्यांकडे मदत मागितली आहे. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. आता शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज यांच्याकडूनच दोन्ही कुटुंबांना अपेक्षा आहेत.