अखिलेश यादव आधी घरचं सांभाळा, अमित शहांचा टोला
By admin | Published: October 14, 2016 04:46 PM2016-10-14T16:46:54+5:302016-10-14T16:46:54+5:30
भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना जे आपलं घर सांभाळू शकत नाहीत ते राज्य काय सांभाळणार अशी टीका केली आहे
Next
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 14 - भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर टीका करताना जे आपलं घर सांभाळू शकत नाहीत ते राज्य काय सांभाळणार अशी टीका केली आहे. रॅलीला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था बिघडत असून पक्षाने आधी घरातील भांडणं सोडवावीत अशी उपहासात्मक टीका अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षावर केली आहे.
राज्यात कायदा - सुव्यवस्था राखण्यात सरकार अपयशी ठरलं आहे. जे स्वत:च्या घरात कायदा सुव्यवस्था राखू शकत नाहीत ते राज्यात काय ठेवणार असं अमित शहा बोलले आहेत. अखिलेशजी उत्तरप्रदेश खूप मोठं आहे. आधी कुटुंब सांभाळा मगच राज्यात शांती निर्माण होईल असा टोला अमित शहांनी लगावला आहे. दलितांसाठी कोणता पक्ष काम करत असेल तर तो भाजपा आहे असंही अमित शहा बोलले आहेत.
Jo apne ghar ko nahi sambhaal pa rahe vo poora rajya kya sambhaalenge. Akhilesh ji pehle apna kunba theek kar lo: Amit Shah pic.twitter.com/eGFOFgMxtZ
— ANI UP (@ANINewsUP) October 14, 2016
उत्तर प्रदेशाच्या राजकारणात यादव कुटुंबाचे मोठे प्रस्थ आहे. पक्षाचे पाचही खासदार हे घरांतील लोकच आहेत. अखिलेश आणि शिवपाल यांच्या वादात सध्याच्या स्थितीला दोन गट पडल्याचे चित्र आहे. अखिलेश यांच्यासोबत पक्षातील युवा कार्यकर्ते आणि जवळपास १५० आमदार सोबत असल्याचा दावा केला जातो, तर शिवपाल यांनी राजीनामा देण्यापूर्वी घेतलेल्या बैठकीला जवळपास १०० आमदार आणि काही मंत्री उपस्थित असल्याचा दावा त्यांचे समर्थक करतात.
काका-पुतण्यामधील वाद वाढल्याने पक्षप्रमुख मुलायम सिंग यांना या प्रकरणात उडी घ्यावी लागली. त्यांनी यावेळी शिवपाल यांची पाठराखण करीत अखिलेश यांना आपले निर्णय मागे घ्यावयास भाग पाडले. शिवपाल यांना सार्वजनिक बांधकाम वगळता इतर सर्व खाती द्यावी लागली. तसेच गायत्री प्रजापती आणि राजकिशोर या मंत्र्यांनादेखील मंत्रिमंडळात घ्यावे लागले. दीपक सिंघल यांना मात्र मुख्य सचिवपद न देता त्यांच्या जागी राहुल भटनागर यांची नेमणूक करण्यात अखिलेश यांना यश आले आहे