फ्री वायफायचा जास्त वापर 'पॉर्न' पाहण्यासाठी

By admin | Published: October 17, 2016 08:49 PM2016-10-17T20:49:17+5:302016-10-17T20:50:49+5:30

देशातील 23 रेल्वे स्थानकांवर फ्री वाय फाय सेवेचा वापर करण्यामध्ये पाटणा स्थानकाचा एक नंबर लागतो. मात्र, येथे या सेवेचा सर्वाधिक वापर

To see more 'free' use of free WiFi | फ्री वायफायचा जास्त वापर 'पॉर्न' पाहण्यासाठी

फ्री वायफायचा जास्त वापर 'पॉर्न' पाहण्यासाठी

Next
>ऑनलाइन लोकमत
 
पाटणा, दि. 17- बिहारच्या पाटणा रेल्वे स्थानकावर गेल्या महिन्यापासून फ्री वाय फाय सेवा सुरू करण्यात आली आहे. देशातील 23 रेल्वे स्थानकांवर फ्री वाय फाय सेवेचा वापर करण्यामध्ये पाटणा स्थानकाचा एक नंबर लागतो.  मात्र, येथे या सेवेचा सर्वाधिक वापर पॉर्न पाहण्यासाठी होत असल्याची माहिती समोर आली आहे. 
 
रेल्वे स्थानकाच्या रेलटेल विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला असून फ्री वायफाय सेवेचा वापर  पॉर्न साईटस पाहण्यासाठी जास्त प्रमाणात होतो असे सांगण्यात आले आहे. याशिवाय येथे अॅप्स आणि चित्रपटही मोठ्या प्रमाणात डाउनलोड करण्यात येतात. 
 
रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी वर्षअखेरपर्यंत 100 रेल्वे स्थानकात फ्री वायफाय सेवा उपलब्ध करुन देणयाची घोषणा केली होती. तसेच येत्या तीन वर्षात 400 रेल्वे स्थानकांवर फ्री वायफाय सुविधा उपलब्ध करुन देण्याचे उद्देश निश्चित केले आहे.

Web Title: To see more 'free' use of free WiFi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.