पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन

By admin | Published: October 18, 2016 10:23 AM2016-10-18T10:23:48+5:302016-10-18T10:26:50+5:30

जम्मू काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन,मंगळवारी मध्यरात्री 1.30 वाजेपर्यंत सुरू होता, अशी माहिती सैन्यातील अधिका-यांनी दिली आहे.

Pakistan's curfew continues, violation of armed forces in Naushera sector | पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन

पाकिस्तानच्या कुरापती सुरूच, नौशेरा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन

Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 18 - पाकिस्तानच्या कुरापती सुरूच आहेत. जम्मू काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. सोमवारी रात्री 8.30 वाजता सुरू झालेला गोळीबार मध्यरात्री 1.30 वाजेपर्यंत सुरू होता, अशी माहिती सैन्यातील अधिका-यांनी दिली आहे.  या गोळीबाराला भारतीय जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. दरम्यान, या हल्ल्यात जीवितहानी झाल्याचे वृत्त अद्यापतरी समोर आलेले नाही. याआधी रविवादेखील याच परिसरातील चार भारतीय पोलीस चौक्यांना लक्ष्य करत पाकिस्तानने गोळीबार केला होता. तसेच रविवारी राजौरी सेक्टरमध्येही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले, यामध्ये जवान सुदीश कुमार शहीद झाले आहेत. 

आणखी बातम्या
सर्जिकल स्ट्राईक RSSच्या ट्रेनिंगमुळे - मनोहर पर्रिकर
पाकिस्तानमध्ये ६ अतिरेक्यांचा खात्मा
पाकचा गोळीबार; एक जवान शहीद
 
28 आणि 29 सप्टेंबर रोजी उरी हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानचे सैन्य आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. यानंतर पाकिस्तानच्या कुरापती अधिक वाढल्या असून आतापर्यंत 28 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.  
 

Web Title: Pakistan's curfew continues, violation of armed forces in Naushera sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.