पठाणकोट हल्ला: सरकारकडून NDTV वर एका दिवसाची बंदी

By admin | Published: November 3, 2016 09:16 PM2016-11-03T21:16:09+5:302016-11-03T21:37:56+5:30

भारतातील आघाडीचे हिंदी न्यूज चॅनल एनडीटीव्ही इंडियावर एका दिवसाची बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने ही कारवाई केली.

Pathankot attack: One day ban on NDTV from government | पठाणकोट हल्ला: सरकारकडून NDTV वर एका दिवसाची बंदी

पठाणकोट हल्ला: सरकारकडून NDTV वर एका दिवसाची बंदी

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - भारतातील आघाडीचे हिंदी न्यूज चॅनल एनडीटीव्ही इंडियावर एका दिवसाची बंदी घालण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाने ही कारवाई केली.  पठाणकोट हल्ला झाला त्यावेळी नियम मोडून कव्हरेज केल्याचा आरोप चॅनलवर ठेवण्यात आला आहे. परिणामी, 9 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजेपासून 24 तासांसाठी एनडीटीव्ही इंडिया या चॅनलचं प्रसारण बंद असणार आहे.  एखाद्या न्यूज चॅनलवर सरकारकडून बंदी घालण्याची ही पहिलीच घटना आहे. 
 
हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार,  पठाणकोट हल्ल्यावेळी  एनडीटीव्ही इंडियाने केलेलं कव्हरेज हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने घातक होतं. त्यांनी दाखवलेल्या माहितीचा दहशतवादी वापर करू शकत होते, अशाप्रकारची माहिती जाहीर करणं हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं घातक आहे. असा आरोप  एनडीटीव्हीवर ठेवण्यात आला आहे.                        
 
दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर लगेचच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटरद्वारे केंद्र सरकारवर निशाणा साधला.  जर मोदींची आरती नाही केली तर तुमचंही चॅनल बंद करतील असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

Web Title: Pathankot attack: One day ban on NDTV from government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.