राहुल गांधी उभे राहिले एटीएमच्या रांगेत
By admin | Published: November 11, 2016 04:52 PM2016-11-11T16:52:03+5:302016-11-11T16:52:24+5:30
एटीएममध्ये खडखडाट असल्याने लोकांना जो त्रास सहन करावा लागतोय अशावेळी आपण लोकांसोबत आहोत हा संदेश देण्यासाठी राहुल एटीएमच्या रांगेत उभे राहिले.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ११ - पैसे काढण्यासाठी दिल्लीत एटीएम केंद्राबाहेर लांबलचक रांग लागलेली असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीही त्या रांगेमध्ये जाऊन उभे राहिले. अचानक राहुल गांधींना रांगेत उभे राहिल्याचे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
एटीएममध्ये खडखडाट असल्याने लोकांना जो त्रास सहन करावा लागतोय अशावेळी आपण लोकांसोबत आहोत हा संदेश देण्यासाठी राहुल एटीएमच्या रांगेत उभे राहिले.
माझ्या लोकांना त्रास सहन करावा लागतोय मी त्यांच्यासोबत आहे असे राहुल म्हणाले. संसद मार्गावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरजवळ लागलेल्या रांगेमध्ये राहुल उभे होते. चार हजार रुपये बदलण्यासाठी आपण इथे आल्याचे राहुल यांनी सांगितले.
Delhi: Congress Vice president Rahul Gandhi in queue at SBI, Parliament street pic.twitter.com/WG6rYoXLel
— ANI (@ANI_news) 11 November 2016