ट्रेंडिंगमधून व्हायरल झालेली सोनम गुप्ता कोण ?
By admin | Published: November 14, 2016 09:30 PM2016-11-14T21:30:01+5:302016-11-14T21:58:23+5:30
नोटांवर लिहिलेलं सोनम गुप्ता हे नाव सध्या वा-यासारख्या पसरलं आहेत.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर देशभरात तो चर्चेचा विषय ठरला. आता सोशल मीडियावर नोटांवर चर्चा झडू लागल्या असून, अनेकांनी तात्काळ जुन्या नोटा बदलून घेतल्या आहेत. मात्र सोशल मीडियावर 500, 1000 आणि 2000 हजार रुपयांच्या नोटा ट्रेंडिंगमध्ये आहेत. या नोटांवर लिहिलेलं सोनम गुप्ता हे नाव सध्या वा-यासारखं पसरलं आहेत.
सोशल मीडियावर सोनम गुप्ताच्या बेवफाईच्या चर्चा खुबीनं रंगत आहेत. सोनम गुप्ता बेवफा आहे, असं लिहिलेल्या नोटा सोशल मीडियावर फारच चर्चेत आल्या आहेत. मात्र खरंच का सोनम गुप्ता बेवफा आहे ? सर्वात पहिल्यांदा 10 रुपयांच्या नोटांवर सोनम गुप्ता बेवफा आहे, असा संदेश लिहिलेली नोट वायरल झाली. त्यानंतर लागोपाठ 10, 20, 100, 2000च्या नोटांवर असा संदेश लिहण्यात आला असून, त्याही नोटा सोशल मीडियावर वा-यासारख्या पसरल्या. मात्र सोनम गुप्ता कोण आहे आणि कुठून आली आहे, हे अद्यापही कोणाला समजलं नाही. मात्र कोणत्या तरी प्रियकरानं सोनम गुप्ताला प्रसिद्ध केल्याची आता चर्चा आहे.
एवढंच नाही तर सोनम गुप्ताची बेवफाई ही विदेशातही जाऊन पोहोचली आहे. अनेक देशांच्या चलनांवर सोनम गुप्ता वेबफा आहे, असे संदेश लिहिण्यात आले आहेत. सोनम गुप्ताचे संदेश लिहिलेल्या नोटांचे फोटो वायरल झाले आहेत. मात्र वायरल झालेली ही सोनम गुप्ता अनेकांच्या पसंतीला उतरली आहे.
Guinness World Records have introduced a new category "Bewafa" for Sonam Gupta :D :D#SonamGuptaBewafaHai#RespectCurrency#DontBeAashiqpic.twitter.com/3G1306PCmw
— Mihir Asher (@AsherMihir) November 14, 2016
PROUD MOMENT FOR INDIA:
— Finger of India (@IndiaFinger) November 14, 2016
Queen of England declares Sonam Gupta as "International Bewafa" ! pic.twitter.com/QWNxcyUS97