IAF चे 'ग्लोबमास्टर' बँकांमध्ये कॅश पोहोचवणार ?

By admin | Published: November 15, 2016 09:03 AM2016-11-15T09:03:09+5:302016-11-15T10:42:29+5:30

५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा रद्द केल्यानंतर निर्माण झालेल्या चलन तुटवडयावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने भारतीय वायू दलाची...

IAF's 'Globemaster' will deliver cash to banks? | IAF चे 'ग्लोबमास्टर' बँकांमध्ये कॅश पोहोचवणार ?

IAF चे 'ग्लोबमास्टर' बँकांमध्ये कॅश पोहोचवणार ?

Next

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १५ - ५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा रद्द केल्यानंतर निर्माण झालेल्या चलन तुटवडयावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने भारतीय वायू दलाची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रेसमध्ये छापल्या जाणा-या नव्या को-या नोटा तात्काळ बँकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वायू दलाच्या हॅलिकॉप्टर्सची मदत घेतली जाऊ शकते. 
 
झारखंडच्या दुर्गम भागातील बँका आणि एटीएममध्ये हॅलिकॉप्टरच्या मदतीने आरबीआयने कॅश पोहोचवल्याची माहिती आहे. जनतेची गरज भागवण्याएवढी पुरेशी कॅश असल्याचे आरबीआयने स्पष्ट केले असले तरी ही कॅश वेळेत बँका, एटीएमपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. अन्यथा लोकांमधील असंतोषाचा स्फोट होऊ शकतो. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही लोकांचा त्रास कमी करण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलणार असल्याचे सांगितले आहे. भारतीय लष्कराचे मालवाहतुकीचे सर्वात मोठे विमान ग्लोबमास्टरने कॅश बँकांपर्यंत पोहोचवली जाणार असल्याचे मेसेजेस काल सोशल मीडियावर फिरत होते. पण या शक्यतेला अद्यापपर्यंत कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 
 

Web Title: IAF's 'Globemaster' will deliver cash to banks?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.