उमेदवारीवरून सपातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर

By admin | Published: December 27, 2016 12:46 AM2016-12-27T00:46:20+5:302016-12-27T00:46:20+5:30

उमेदवार निवडीच्या मुद्द्यावरून समाजवादी पक्षातील सत्तासंघर्ष व मतभेद सोमवारी नव्याने समोर आले. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उमेदवारांची समांतर यादी तयार केल्याबद्दल

The differences in the SP over the party again | उमेदवारीवरून सपातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर

उमेदवारीवरून सपातील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर

Next

लखनौ : उमेदवार निवडीच्या मुद्द्यावरून समाजवादी पक्षातील सत्तासंघर्ष व मतभेद सोमवारी नव्याने समोर आले. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उमेदवारांची समांतर यादी तयार केल्याबद्दल पक्षाचे उत्तर प्रदेश अध्यक्ष शिवपाल यादव यांनी त्यांच्यावर हल्ला केला. शिवपाल यादव यांनी निवडलेली १७५ नावे आपल्या चुलत्याशी दोन हात करीत असलेल्या अखिलेश यादव यांच्या पचनी पडलेली नाहीत, असे पक्षातील अंतर्गत सूत्रांकडून समजते.
अखिलेश यादव यांनी राज्य विधानसभेतील सर्वच्या सर्व ४०३ जागांवर आपल्या पसंतीच्या उमेदवारांची निवड करून ती यादी पक्षाचे सर्वोच्च नेते व आपले वडील मुलायमसिंह यादव यांच्याकडे पाठवली आहे. २४ डिसेंबर रोजी अखिलेश यादव यांनी आपल्या निवासस्थानी प्रथमच आमदारांची भेट घेऊन त्यांना पक्षातर्फे तिकीट देण्याचे आश्वासन दिले.
शिवपाल यादव यांनी तिकीट वाटपाचे अधिकार प्रत्यक्षात मलाच आहेत, असे सूचित करणारे टिष्ट्वटवर टिष्ट्वट केल्यानंतर पक्षातील तीव्र मतभेद समोर आले. शिवपाल यादव यांनी १७५ उमेदवारांची नावे आधीच निश्चत झालेली असून पक्षाची प्रतिमा डागाळणारी कोणतीही बेशिस्त खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला
आहे. निवडून येण्याच्या क्षमतेवरच पक्षातर्फे तिकीट दिले गेले आहे व आताही तोच निकष आहे. १७५ जणांना तिकिटे दिलीही गेली आहेत. मुख्यमंत्र्याची निवड पक्षाच्या घटनेनुसार विधिमंडळ पक्ष करील, असे शिवपाल यादव यांनी हिंदी भाषेतून केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले. (वृत्तसंस्था)

भाजपचे तेज मावळले : मायावती
नोटाबंदीमुळे बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांना मोठा फटका बसल्याचा भाजपने केलेला दावा पक्षाच्या नेत्या मायावती यांनी फेटाळला.
नोटाबंदीमुळे सामान्य लोकांना जो त्रास झाला त्याची किमत उत्तर प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला मोजावी लागेल व त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील चमक उतरली आहे, असे मायावती यांनी सोमवारी वार्ताहरांशी बोलताना सांगितले.
भाजपचे नेते नरेंद्र मोदी, अमित शाह व केंद्रीय नेत्यांच्या चेहऱ्यावरील चमक निघून गेली आहे कारण बसपचा या निवडणुकीत विजय निश्चित आहे, असे त्या म्हणाल्या.
येत्या निवडणुकीत बसपच सत्तेवर येणार असल्यामुळे माझ्या किंवा बसपच्या कोणत्याही कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावरील चमक गेलेली नाही, असेही त्या म्हणाल्या.

नोटाबंदी मोदींच्या मित्रांसाठी : बब्बर
मुजफ्फरनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या काही मित्रांच्या फायद्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला असल्याचा आरोप उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांनी रविवारी केला.
पुरकाझी (जि. मुजफ्फरनगर) गावात ते जाहीर सभेत बोलत होते. नोटाबंदीच्या निर्णयामुळे लोकांना खूप त्रास होत असून आगामी विधानसभा निवडणुकीत ते भाजपला धडा शिकवतील, असे बब्बर म्हणाले.

Web Title: The differences in the SP over the party again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.