‘संस्कृत’ गावच्या प्रत्येक घरात आयटी इंजिनीअर
By Admin | Published: January 11, 2017 12:58 AM2017-01-11T00:58:24+5:302017-01-11T00:58:24+5:30
हे आहे कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील तुंगा नदीच्या किनाऱ्यावरील मात्तूर गाव. येथील वैशिष्ट हे आहे की, गावची भाषा संस्कृत आहे आणि हो
हे आहे कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील तुंगा नदीच्या किनाऱ्यावरील मात्तूर गाव. येथील वैशिष्ट हे आहे की, गावची भाषा संस्कृत आहे आणि हो, प्रत्येक घरातूून किमान एक व्यक्ती आयटी इंजिनिअर आहे. हे कृषिप्रधान गाव आहे. काजू आणि भाताची शेती येथे उत्पन्नाचे साधन आहे. येथील ब्राह्मण समुदाय ६०० वर्षांपूर्वी केरळातून येथे आला आणि येथेच स्थायिक झाला. संस्कृतशिवाय संकेती ही दुर्मिळ भाषाही येथे बोलली जाते.
संस्कृत, तामिळ, कन्नड, तेलुगु या भाषांपासून ही संकेती भाषा बनलेली आहे. पुजाऱ्यापासून ते भाजी विक्रेत्यापर्यंत प्रत्येक जण येथे संस्कृत भाषेशी जोडला गेलेला आहे. तरुण मुलेही अगदी मैदानावर खेळतानाही संस्कृत भाषा बोलतात. अनेकांच्या घरांच्या दरवाज्यावरच लिहिलेले आहे की, आपण या घरात संस्कृत बोलू शकतात. संस्कृतमध्ये अग्रेसर असलेल्या या मुलांना गणित व अन्य विषयातही याचा फायदा होतो, असे येथील शिक्षकांनी सांगितले. या गावचे मूळ रहिवासी असलेले ३० प्राध्यापक बंगळुुरु, म्हैसूर आणि मेंगलोर विद्यापीठात संस्कृतचे अध्यापन करतात. शिक्षणाचे महत्व जाणून असलेल्या या गावात प्रत्येक घरातून किमान एक आयटी इंजिनिअर आहे.