संघप्रमुखांच्या सभेला परवानगी नाकारली
By admin | Published: January 13, 2017 12:59 AM2017-01-13T00:59:03+5:302017-01-13T00:59:03+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या १४ जानेवारी रोजी कोलकात्यात होणाऱ्या सभेस पोलिसांनी
कोलकाता : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या १४ जानेवारी रोजी कोलकात्यात होणाऱ्या सभेस पोलिसांनी परवानगी नाकारल्याने, संघाने उच्च न्यायालयात धाव घेतली.
भागवत शुक्रवारी रात्री कोलकात्यात पोहोचणार असून, शनिवारी मकर संक्रांतीनिमित्त संघ स्वयंसेवकांचे संचलन व त्यानंतर सरसंघचालकांचे प्रबोधन असा कार्यक्रम घेण्याची संघाची योजना आहे. त्यासाठी रा. स्व. संघाने आधी भूकैलाश ट्रस्ट या खासगी ट्रस्टचे मैदान घेतले होते, परंतु पोलिसांनी परवानगी नाकारली. नंतर लष्कराकडून परेड मैदान घेतले, पण तेथील कार्यक्रमासही पोलिसांनी परवानगी नाकारली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी पंतप्रधान मोदी, भाजपा व एकूणच उजव्या संघटनांविरुद्ध खूपच आक्रमक झाल्या आहेत. (वृत्तसंस्था)