आज ठरणार सायकलचा मालक कोण ? निवडणूक आयोग देणार निर्णय

By admin | Published: January 13, 2017 10:50 AM2017-01-13T10:50:01+5:302017-01-13T10:50:01+5:30

समाजवादी पक्षातील दंगल अद्यापही सुरुच असून सायकल चिन्हावरुन सुरु असलेली लढाई नेमकं कोण जिंकणार याची घोषणा आज होऊ शकते

Who is the bicycle owner today? Election Commission will decide | आज ठरणार सायकलचा मालक कोण ? निवडणूक आयोग देणार निर्णय

आज ठरणार सायकलचा मालक कोण ? निवडणूक आयोग देणार निर्णय

Next
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 13 - समाजवादी पक्षातील दंगल अद्यापही सुरुच असून  सायकल चिन्हावरुन सुरु असलेली लढाई नेमकं कोण जिंकणार याची घोषणा आज होऊ शकते. उत्तरप्रदेशमधील निवडणुकीमध्ये अजून काही डावपेच आहेत का हेदेखील समोर येऊ शकतं. मुलायम सिंह आणि अखिलेश यादव पिता-पुत्रात सुरु असलेल्या या हाय व्होल्टेज सामन्यात निवडणूक आयोग पंचाची भूमिका निभावत आहे. आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार असून त्यानंतर निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षात दोन गट पडले असून दोघांनीही सायकल चिन्हावर आपला दावा ठोकला आहे. 
 
(सायकलसाठी पित्याने धरला हट्ट!)
(सायकल नक्की कुणाची ? निवडणूक आयोगाने मागितलं उत्तर)
 
निवडणूक आयोगासमोर आज होणा-या निर्णयाआधी दोन्ही गटांनी पुढील रणनीती ठरवण्यासाठी कायदेशीर सल्ले घेतले. अखिलेश यांच्या गटातून रामगोपाल यादव आणि नरेश अग्रवाल जबाबदारी सांभाळत असून, दुसरीकडे मुलायम सिंह गटातून शिवपाल यादव आणि अमर सिंह लढाई लढत आहेत. 
 
(समाजवादी पक्षात समझोता अशक्यच)
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही गटांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही गटांनी आपापसात बातचीत करत निवडणूक आयोगाकडून निवेदन मागे घेण्याचा आग्रह केला. दोन्ही गटांमध्ये सकारात्मक चर्चा सुरु असून ठोस निर्णय येण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाकडून तीन ते चार दिवसांचा कालावधी मागून त्यादरम्यान योग्य करार करावा अशी रणनीती सध्या ठरलं असल्याचं कळत आहे. 17 जानेवारीपासून उत्तरप्रदेश निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत आहे. 
 
सपाच्या दोन्ही गटांनी सायकल चिन्हावर दावा केल्यानंतर, निवडणूक आयोगाने त्यांच्याकडून दाखल दस्तऐवजांवर अभ्यास सुरू केला. आपले समर्थक आमदार, खासदार यांचे हस्ताक्षरित शपथपत्र आयोगाने या गटांना मागितले आहेत. कोणत्या गटाजवळ किती संख्याबळ आहे, याची माहिती या माध्यमातून समजणार आहे. सपाच्या वादग्रस्त राष्ट्रीय अधिवेशनात पक्षाचे २२९ पैकी २०० आमदार, मोठ्या संख्येने विधान परिषद सदस्य व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
अखिलेश यांचे निकटवर्तीय समजले जाणारे खासदार नरेश अग्रवाल यांनी असा दावा केला आहे की, पक्षाचे बहुतांश आमदार, खासदार हे अखिलेश यांच्यासोबत आहेत. 
 
अखिलेशच्या पाठी २00हून अधिक आमदार
अखिलेश यांनीही आमदार, खासदारांची शपथपत्रे जमविणे सुरू केले आहे. सपाच्या २२९ पैकी २१४ आमदारांचा अखिलेश यांना पाठिंबा असल्याचा दावा त्यांच्या गटातर्फे केला आहे. अखिलेश यांचा गट आज शुक्रवारी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. अखिलेश यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी आमदार, खासदारांशी चर्चा करून शपथपत्रावर या नेत्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या. सायकल चिन्ह मिळविण्यासाठी या गटाकडूनही कुठलीही कसर सोडण्यात आलेली नाही. शंभर आमदारांनी यापूर्वीच शपथपत्रावर स्वाक्षऱ्या केल्या असल्याचेही अखिलेश यांच्या गटातील नेत्यांनी सांगितले.

Web Title: Who is the bicycle owner today? Election Commission will decide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.