तक्रारी असल्यास थेट माझ्याकडे या - लष्करप्रमुख
By admin | Published: January 13, 2017 03:21 PM2017-01-13T15:21:17+5:302017-01-13T15:32:40+5:30
पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये सुरु केलेल्या छुप्या युद्धावर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी शुक्रवारी चिंता व्यक्त केली.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 13 - पाकिस्तानने जम्मू-काश्मीरमध्ये सुरु केलेल्या छुप्या युद्धावर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी शुक्रवारी चिंता व्यक्त केली. पाकिस्तानच्या या कृतीमुळे भारतातील धर्मनिरपेक्षतेवर परिणाम होत आहे असे त्यांनी सांगितले. सुरक्षा दलांच्या प्रयत्नांमुळे आपल्याला जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणता आली असे त्यांनी सांगितले.
नवी दिल्लीत आयोजित केलेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी जवानांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून तक्रारी न करता तक्रारपेटीचा वापर करावा असे सांगितले. लष्करी मुख्यालयासह अन्य केंद्रांवर लष्कराकडून सल्ला आणि तक्रारपेटीची सेवा सुरु करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्यांना कुणाला तक्रारी असतील त्यांनी तक्रारपेटीचा आधार घ्यावा आम्ही जवानांच्या म्हणण्याची दखल घेऊ असे त्यांनी सांगितले. ज्यांच्या तक्रारी सुटल्या नाहीत त्यांनी थेट माझ्याकडे यावे असे रावत यांनी सांगितले. तक्रारी, समस्या मांडणा-या जवानांची ओळख गुप्त ठेवण्याचे आश्वासन रावत यांनी दिले.