नवज्योत सिंग सिद्धू 100 टक्के काँग्रेसमध्ये - कॅप्टन अमरिंदर सिंग
By admin | Published: January 14, 2017 06:00 PM2017-01-14T18:00:39+5:302017-01-14T18:01:46+5:30
सिद्धू एक ते दोन दिवसात काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. राज्यभरात काँग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर असेल असे नवज्योत कौर यांनी सांगितले होते.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - नवज्योत सिंग सिद्धू आता काँग्रेसचे सदस्य असून ते काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढवतील असे पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शनिवारी सांगितले. नवज्योत सिंग सिद्धू 100 टक्के काँग्रेसमध्ये असून नवज्योत कौर यांनी घोषणा केल्याप्रमाणे ते अमृतसर पूर्वमधून विधानसभेची निवडणूक लढवतील असे अमरिंदर सिंग यांनी सांगितले.
सिद्धू एक ते दोन दिवसात काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. राज्यभरात काँग्रेसच्या प्रचाराची जबाबदारी त्यांच्यावर असेल असे नवज्योत कौर यांनी सांगितले होते. त्यापार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग बोलत होते.
सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर ज्या अमृतसर पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडून विधानसभेवर गेल्या त्याच मतदारसंघातून सिद्धू निवडणूक लढवू शकतात. सिद्धू निवडणूकीला उभे राहिले तर मी त्यांच्यासाठी प्रचार करेन असे कौर यांनी सांगितले.