ही तर माझी घरवापसी - सिद्धू
By admin | Published: January 16, 2017 11:23 AM2017-01-16T11:23:56+5:302017-01-16T11:59:59+5:30
मी जन्मत: काँग्रेसीच होतो, माझे वडील काँग्रेसी होते, काँग्रेसकडून ते आमदारही झाले होते, त्यामुळे काल काँग्रेस पक्षाता केलेला प्रवेश ही माझी घरवापसीच आहे
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - मी जन्मत: काँग्रेसीच होतो, माझे वडील काँग्रेसी होते, काँग्रेसकडून ते आमदारही झाले होते, त्यामुळे काल काँग्रेस पक्षाता केलेला प्रवेश ही माझी घरवापसीच आहे, असे काँग्रेमध्ये दाखल झालेले माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे माजी खासदार नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयातून प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सिद्धू यांनी आपल्या विरोधकांवर चौफेर निशाणा साधला. " कुठलाही राजकीय पक्ष वाईट नाही, पण ते पक्ष चालवणारे वाईट आहेत. अकाली दलाचे सर्वेसर्वा असलेल्या बादल यांनी पंजाबची वाट लावली आहे. बादल यांची नियत वाईट आहे." असा घणाघात सिद्धू यांनी केला. यावेळी त्यांनी आपल्या खास शैलीत काँग्रेसची तुलना कौशल्येशी तर भाजपची तुलना कैकयीशी केली.
I am a born Congressman, have come back to my roots: Navjot Singh Sidhu pic.twitter.com/MombAgoRGK
— ANI (@ANI_news) 16 January 2017
बादल सरकारच्या काळात पंजाबच्या झालेल्या दुरवस्थेवरही सिद्धू यांनी बोट ठेवले, पंजाब आज कर्जबाजारी झाला आहे. जो पंजाब एके काळी हरित क्रांतीसाठी ओळखला जायचा, तो आज सफेद चिट्टा (ड्रग्ज) साठी ओळखला जात आहे, अंमली पदार्थ हे पंजाबचे आजचे वास्तव बनले आहेत, विरोधक टीका करतील, पण त्याची पर्वा मी करणार नाही, ही माझी वैयक्तिक लढाई नाही तर पंजाबच्या स्वाभिमानाची लढाऊ आहे, असेही सिद्धू यांनी यावेळी सांगितले. तसेच त्यासाठी आपण तयार असल्याचेही सिद्धू म्हणाले.
Bhaag baaba Badal bhaag, kursi khaali kar, Punjab ki janta aati hai: Navjot Singh Sidhu pic.twitter.com/FLweKXmxcV
— ANI (@ANI_news) 16 January 2017