PHOTOS : जल्लीकट्टीवरील बंदीविरोधात हजारो लोक मरीना बीचवर
By admin | Published: January 18, 2017 09:56 PM2017-01-18T21:56:38+5:302017-01-18T22:03:59+5:30
जल्लीकट्टूवरील बंदी उठविण्यासाठी तामीळनाडूमध्ये आंदोलन सुरु आहे. येथील मरीना बीचवर हजारो लोक जमा झाले असून यामध्ये अनेक युवकांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 18 - जल्लीकट्टूवरील बंदी उठविण्यासाठी तामीळनाडूमध्ये आंदोलन सुरु आहे. चेन्नईमधील मरीना बीचवर हजारो लोक जमा झाले असून यामध्ये अनेक युवकांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे.
तामिळनाडूमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या पोंगल सणाच्या निमित्ताने खेळल्या जाणाऱ्या जल्लीकट्टू या पारंपरिक खेळावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. ही बंदी उठविण्यासाठी येथील स्थानिक नागरिकांनी मोठे आंदोलन पुकारले आहे. मंगळवारी रात्री तीन हजारहून अधिक लोकांनी कँडल मार्च काढला होता. त्यानंतर बुधवारी चेन्नई येथील मरीन बीच, मदुराई अशा अनेक भागात आंदोलने करण्यात आली. यावेळी या आंदोलनात मोठ्या प्रमाणात युवकांनी सहभाग घेतला होता.
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर येथील अनेक भागातील शाळा आणि कॉलेजना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.