इरोम शर्मिला यांनी संरक्षण नाकारले
By admin | Published: February 28, 2017 04:21 AM2017-02-28T04:21:35+5:302017-02-28T04:21:35+5:30
निवडणूक आयोगाच्या आदेशावरून राज्य सरकारने पुरविलेले संरक्षण स्वीकारण्यास इरोम शर्मिला चानु यांनी सोमवारी नकार दिला.
Next
इम्फाळ : निवडणूक आयोगाच्या आदेशावरून राज्य सरकारने पुरविलेले संरक्षण स्वीकारण्यास इरोम शर्मिला चानु यांनी सोमवारी नकार दिला. त्या मणिपूरमध्ये विधानसभेची निवडणूक लढवत आहेत. राज्यातील जनतेवर आणि विशेषत: महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात १४ वर्षे त्या उपोषण करीत होत्या.
शर्मिला म्हणाल्या की, ‘माझे कोणाशीही शत्रुत्व नसल्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. मला लोकांमध्ये राहायचे आहे. सशस्त्र दलांच्या वेढ्यातील व्हीआयपी संस्कृती मला मान्य नाही.’ राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव जे. सुरेश बाबू म्हणाले की, ‘देशाच्या निवडणूक आयोगाने शर्मिला या बहुतेक वेळा एकट्याने प्रवास करतात.’