चॉकलेटच्या किंमतीत विकली जात आहे तुमची वैयक्तिक माहिती
By admin | Published: February 28, 2017 07:53 AM2017-02-28T07:53:24+5:302017-02-28T09:46:55+5:30
तुमची वैयक्तिक माहिती म्हणजेच मोबाईल नंबर, ईमेल आयडी, नोकरी, पगार अत्यंत कमी किंमतीत विकली जात आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - डेटा आजच्या वेळेत अत्यंत महत्वाची गोष्ट असल्याचं तुम्ही समजत असाल तर सावध व्हा. कारण तुमची वैयक्तिक माहिती म्हणजेच मोबाईल नंबर, ईमेल आयडी, नोकरी, पगार अत्यंत कमी किंमतीत विकली जात आहे. अशाप्रकारची खासगी माहिती विकण्यासाठी लावण्यात येणारी एक किंमत ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. ही किंमत एका चॉकलेपटपेक्षाही कमी आहे.
इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार त्यांनी तब्बल एक महिनाभर केलेल्या अभ्यासात काही डाटा ब्रोकर्सची भेट घेतली. हे ब्रोकर्स लोकांची वैयक्तिक माहिती हॅक करुन विकतात. फक्त 10 ते 15 हजार रुपयांमध्ये बंगळुरु, हैदराबाद, दिल्लीजवळील एक लाख लोकांची माहिती देण्यास हे ब्रोकर्स तयार झाले होते.
विकण्यासाठी तयार करण्यात आलेली यादी खास प्रकारे तयार करण्यात आलेली असते. एका डेटा ब्रोकरने सांगितलं की, 'जर मला थोडा अजून वेळ मिळाला तर जास्त पगार असणारे आणि एकटे राहणारे तसंच क्रेडिट कार्डधारक, कार मालक आणि निवृत्त महिलांची वेगळी यादी काढू शकतो'.
काही ब्रोकर्स तर फ्री सँपल म्हणजेच नमुनादेखील पाठवतात. एक्सेल शीटमध्ये बंगळुरुमधील लोकांची वैयक्तिक माहिती, पत्ता आणि संपत्तीची पुर्ण माहिती देतात. अशाच प्रकारे ब्रोकरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हैदराबादमधील राजशेखर यांच्याशी संपर्क साधण्यात आला असता ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गुडगावमधील ब्रोकरने त्यांची माहिती पुरवली होती. त्याने एचडीएफसी आणि अॅक्सिक बँकमधील 3000 लोकांच्या क्रेडिट कार्डची माहिती दिली होती. ज्यासाठी फक्त एक हजार रुपये मोजण्यात आले होते.
बंगळुरु, दिल्ली आणि एनसीआरमधील तब्बल 1.7 लाख लोकांची माहिती आपल्याकडे असून फक्त सात हजार रुपयांत उपलब्ध करुन देऊ शकतो असा दावा ब्रोकरने केला आहे.