असहिष्णू गँगचे पुनरागमन - अनुपम खेर

By admin | Published: March 1, 2017 04:52 PM2017-03-01T16:52:03+5:302017-03-01T17:02:39+5:30

विरेंद्र सेहवाग, योगेश्वर दत्तर, विद्या बालन नंतर आता या वादात अनुपम खेर यांनी उडी घेत नव्या वादाला वळण दिले आहे.

Return of intolerant gang - Anupam Kher | असहिष्णू गँगचे पुनरागमन - अनुपम खेर

असहिष्णू गँगचे पुनरागमन - अनुपम खेर

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 1 - दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थिनी गुरमेहर कौर प्रकरणाच्या वादात अभिनेते अनुपम खेर यांनी उडी घेतली आहे. गुरमेहर कौरला बलात्काराच्या आणि जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर विद्यापीठ आणि दिल्लीतील वातावरण भलतेच तापले आहे. सोशल मीडियावर याचे रणकंद सुरु झाले आहे. विरेंद्र सेहवाग, योगेश्वर दत्तर, विद्या बालन नंतर आता या वादात अनुपम खेर यांनी उडी घेत नव्या वादाला वळण दिले आहे.

वेगळा मुद्दा घेऊन असहिष्णूतेची गँग परत आली आहे. त्यांच्या घोषणा वेगळ्या असल्या तरी चेहरे तेच आहेत असे एक ट्विट अनुपम खेर यांनी केले आहे. ट्विटवर हॅश-टॅग करताना त्यांनी #Intolerance #AwardWapsi #Emergency #DemonitisationDisaster #BharatKeTukde या शब्दांचा वापर केला आहे. आणखी एक ट्विट करताना त्यांनी देशभक्तीचा नारा लगवला आहे. देशभक्तीच्या प्रखर भावनेवर जितके प्रश्न उपस्थित केले जातात, तितकी देशभक्ती वाढत जाते, असे त्यांनी त्यात म्हटले आहे. अनुपम खेर यांना भाजपच्या जवळचे मानले जातात. गेल्या वर्षी जेएनयूमधील संघर्षातही त्यांनी उडी घेतली होती. अनुपम खेर यांच्या पत्नी किरण या भाजपच्या खासदार आहेत.

 



गुरमेहरचे समर्थन करणा-यांना पाकिस्तानबद्दल कळवळा असून, त्यांना देशाबाहेर हाकलले पाहिजे असे वादग्रस्त वक्तव्य अनिल वीज यांनी केले आहे.

दरम्यान, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुरमेहर कौरच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणण्याच्या प्रकाराबद्दल आणि तिला अभाविपकडून दिल्या जाणाऱ्या धमक्यांबद्दल संताप व्यक्त केला आहे. तिच्या महाविद्यालयानेही गुरमेहरच्या कृतीचे समर्थन केले आहे.
आपण कोणाला घाबरत नाही. मात्र अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्याविरोधातील (अभाविप) मोहीम थांबवत आहोत, असे गुरमेहरने म्हटले. काल ती आपल्या जालंधर या गावी गेली. तेथील माजी सैनिकांच्या संघटनेने गुरमेहरला दिल्या जाणाऱ्या धमक्या खपवून घेतल्या जाणार नाहीत आणि आम्ही तिच्यामागे उभे आहोत, असे म्हटले आहे. तिच्या आजोबांनीही आपण गुरमेहरच्या मागे ठामपणे उभे राहू, असे म्हटले.

Web Title: Return of intolerant gang - Anupam Kher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.