हैदराबाद विमानतळ ठरलं जगातील सर्वोत्तम

By Admin | Published: March 7, 2017 12:40 PM2017-03-07T12:40:35+5:302017-03-07T13:52:33+5:30

जगभरातील सर्वोत्तम विमानतळाच्या यादीत हैदराबाद विमानतळाने अव्वल स्थान गाठले आहे.

Hyderabad airport became the world's best | हैदराबाद विमानतळ ठरलं जगातील सर्वोत्तम

हैदराबाद विमानतळ ठरलं जगातील सर्वोत्तम

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - भारतातील हैदराबाद विमानतळ जगातील सर्वोत्तम विमानतळ ठरलं आहे. एअरपोर्ट काऊन्सिल इंटरनॅशनलतर्फे (एसीआय) विमानतळावर मिळणा-या सुविधेच्या (एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी -एएसआय) आणि विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येच्या आधारे ही निवड केली जाते. 
 
याद्वारे 50 लाख ते दीड कोटी प्रवाशांची वर्दळ असलेल्या विमानतळांच्या यादीत हैदराबादमधील जीएमआर आंतरराष्ट्रीय विमातळाने 2016 मधील जगातील सर्वोत्तम विमानतळाच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. . तर वर्षाला चार कोटी प्रवाशांची वर्दळ असलेल्या विमानतळांच्या गटात दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. यामध्ये पहिल्या स्थानी दक्षिण कोरियातील विमानतळाचा नंबर लागला आहे. 
 
विमान कंपन्या, हाऊसकिपींगच्या कर्मचा-यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आम्हाला पहिले स्थान पटकावता आले. केंद्र सरकार, सीआयएसएफ, विमान कंपन्यांना अशी प्रतिक्रिया जीएमआर हैद्राबाद आंतराष्ट्रीय विमानतळाचे सीईओ एसजीके किशोर यांनी दिली. लवकरच विमानतळाच्या विस्ताराचे काम सुरु करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. 
 
 

Web Title: Hyderabad airport became the world's best

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.