कुत्रा चावला म्हणून मालकाला चोपला

By admin | Published: March 9, 2017 11:00 AM2017-03-09T11:00:46+5:302017-03-09T11:05:38+5:30

मेमनगरमधील सारजन टॉवरमध्ये कुत्र्याने चावा घेतल्याने मालकाला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे

Chopla as the dog Chawla | कुत्रा चावला म्हणून मालकाला चोपला

कुत्रा चावला म्हणून मालकाला चोपला

Next
>ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 9 - मेमनगरमधील सारजन टॉवरमध्ये कुत्र्याने चावा घेतल्याने मालकाला मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सोसायटीत फिरत असताना शेजा-याच्या कुत्र्याने आपला चावा घेतल्याचा आरोप 32 वर्षीय धवल शाह यांनी केला आहे. धवल शाह यांनी सांगितलं आहे की, 'आपल्याच सोसायटीत राहत असलेल्या सास-यांच्या घऱी आपण जात असताना शेजारी धर्मेंद्र यांच्या जर्मन शेफर्ड कुत्र्याने आपला चावा घेतला'. धवल शाह यांनी घाटलोडिया पोलीस ठाण्यात कुत्र्याचे मालक धर्मेंद्र यांच्याविरोधात तक्रार केली आहे.
 
धर्मेंद्र यांनीदेखील तक्रार केली असून कुत्र्याने चावा घेतल्याने धवल शाहने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 
 
धवल शाह यांची पत्नी दिक्षात यांनी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत सांगितलं आहे की, 'माझे पती सोसायटीतील एम ब्लॉकमधील आमच्या घरुन एच ब्लॉकमध्ये माझ्या वडिलांच्या घरी चालले होते. त्याचवेळी धर्मेंद्र यांचा कुत्रा कैजन याने त्यांच्यावर हल्ला केला'. कुत्र्याने हाताचा चावा घेतला असून पाठीवरदेखील जखमा झाल्या आहेत. 
 
तक्रारीनुसार जेव्हा दिक्षिता यांनी धर्मेंद्र यांच्याकडे याबाबत तक्रार केली तेव्हा त्यांनी दोघांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. यानंतर धवल आणि धर्मेंद्र यांच्यात हाणामारी झाली. 
 
धर्मेद्र यांच्या डोक्याला जखम झाली आहे. तर धवल शाह यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रकरणाचा तपास करत असलेल्या एमडी वघेला यांनी सांगितलं आहे की, 'मारहाणीच्या आरोपाखाली आम्ही धवल शाह यांना अटक केली होती, नंतर जामीनावर त्यांची सुटका करण्यात आली'.
 

Web Title: Chopla as the dog Chawla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.