फरार विजय माल्या बॅंकांसोबत 'सेटलमेंट'साठी तयार

By admin | Published: March 10, 2017 05:39 PM2017-03-10T17:39:31+5:302017-03-10T17:39:31+5:30

तब्बल 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून देश सोडून गेलेल्या विजय माल्याने बॅंकांसोबत सेटलमेंट करण्याची तयारी दाखवली

The absconding Vijay Mallya is ready for settlement with the banks | फरार विजय माल्या बॅंकांसोबत 'सेटलमेंट'साठी तयार

फरार विजय माल्या बॅंकांसोबत 'सेटलमेंट'साठी तयार

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - तब्बल 9 हजार कोटींचे कर्ज बुडवून देश सोडून गेलेल्या विजय माल्याने बॅंकांसोबत सेटलमेंट करण्याची तयारी दाखवली आहे. ट्विट करून त्याने बॅंकांसोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. सार्वजनिक बँकांमध्ये एकाच वेळी सर्व कर्ज फेडण्याची तरतूद आहे. शेकडो कर्जदारांनी या नियमांतर्गत कर्ज फेडले आहे. मग मला असं करण्यापासून का रोखलं जात आहे, असा सवाल त्यांनी विचारला.
 
याप्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची मागणीही माल्याने केली. याशिवाय त्यांनी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांच्यावर टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयात रोहतगी यांनी नोंदवलेल्या सर्व जबाबावरून ते माझ्याविरोधात आहेत हे स्पष्ट होतं असं ते म्हणाले.  आमच्या प्रस्तावावर विचार न करता तो फेटाळण्यात आला,  मी योग्य पद्धतीने चर्चा करण्यास तयार आहे असं ट्विट माल्याने केलं आहे.   
 
यापुर्वी काल सर्वोच्च न्यायालयाने विजय माल्याला भारतात परत आणण्यासाठी काय पावले उचलली? असा सवाल सरकारला विचारला होता. देश सोडून गेलेल्या विजय माल्याला भारत-यूके म्युचुअल लीगल असिस्टंन्स ट्रीटी ( MLAT) चे पालन करून परत आणण्यासाठी मुंबई येथील विषेश न्यायालयाने आधीच मंजूरी दिली आहे. भारत आणि इंग्लडदरम्यान 1992 मध्ये म्यूचुअल लीगल असिस्टन्स ट्रीटी (MLAT) झाली होती. याअंतर्गत दोन्ही देशातील गुन्हेगारी प्रकरणातील आरोपींना त्या-त्या देशाकडे सोपवण्यात येते. या MLAT मध्ये पुरावा देणे, चौकशीसाठी सहकार्य करणे आणि आरोपीच्या कस्टडीचा देखील सामावेश आहे. इडीने याच कराराच्या आधारावर माल्याला ताब्यात देण्याची मागणी केली आहे.
 

Web Title: The absconding Vijay Mallya is ready for settlement with the banks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.