Election Results Live - उत्तराखंडमध्ये भाजपा सत्तेच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2017 09:31 AM2017-03-11T09:31:06+5:302017-03-11T09:34:21+5:30

उत्तराखंडमधील 70 विधानसभा जागांपैकी 49 जागांचे निकाल हाती आले असून भाजपा 37 तर काँग्रेस 10 जागांवर आघाडीवर आहे

Election Results Live - In the Uttarakhand BJP, on the road to power | Election Results Live - उत्तराखंडमध्ये भाजपा सत्तेच्या वाटेवर

Election Results Live - उत्तराखंडमध्ये भाजपा सत्तेच्या वाटेवर

Next
>ऑनलाइन लोकमत
देहरादून, दि. 11 - उत्तराखंडमधील 70 विधानसभा जागांपैकी 49 जागांचे निकाल हाती आले असून भाजपा 37 तर काँग्रेस 10 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय बीएसपी आणि अन्य 1-1 जागांवर आघाडीवर आहे. 70 सदस्यांच्या उत्तराखंड विधानसेत 15 फेब्रुवारी रोजी 69 जागांसाठी मतदान झालं होतं. सुरुवातीला हाती आलेल्या आकडेवारीनुसार मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरिश रावत हरिद्वार ग्रामीणमधून पिछाडीवर आहे. हरिश रावत दोन जागांवरुन निवडणूक लढवत आहेत. कर्णप्रयाग येथे बीएसपी उमेदवाराचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर तेथील मतदान रद्द करण्यात आलं होतं. 
 
एकूण 65.64 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. ऊधम सिंह नगरमध्ये सर्वात जास्त 75.79 टक्के मतदान झाल होतं, तर अल्मोडा येथे सर्वात कमी 52.81 टक्के मतदान झालं होतं. 
 
उत्तराखंडमध्ये दणदणीत बहुमतासह भाजपाचे सत्तेत पुनरागमन होईल असा अंदाज न्यूज-24 आणि टुडेज चाणक्यने वर्तवला आहे. मात्र इंडिया टीव्ही आणि सीसेरोने आपल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी 29 ते 35 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केल्याने उत्तराखंडमधील निकालांबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 
 
उत्तराखंडचे वर्तमान मुख्यमंत्री हरिश रावत यांनी सत्ता कायम राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावले होते. पण भाजपानेही सत्तेत पुनरागमन करण्यासाठी कंबर कसली होती. दरम्यान, न्यूज 24 आणि टुडेज चाणक्यचा एक्झिट पोल भाजपासाठी आनंदाची बातमी घेऊन आला. 71 सदस्य असलेल्या उत्तराखंडच्या विधानसभेत भाजपाला 53 जागांसह निर्विवाद बहुमत मिळेल असा दावा या एक्झिट पोलमधून करण्यात आला आहेत. न्यूज-24 आणि टुडेज चाणक्यने या पोलमध्ये काँग्रेसला 15 आणि इतरांना केवळ दोन जागा दिल्या आहेत.
 
तर इंडिया टुडे आणि सीसेरोने आपल्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये कांटे की लढत झाल्याचे सांगितले आहे. या एक्झिट पोलनुसार उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी 29 ते 35 जागा मिळण्याची शक्यता आहे. सी व्होटरनेही उत्तराखंडमध्ये काँग्रेस आणि भाजपाला प्रत्येकी 32 जागा मिळतील, असे भाकीत आपल्या एक्झिट पोलमधून केले आहे.
 
उत्तराखंडमध्ये 2012 च्या निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर काँग्रेसने इतर पक्षांच्या साथीने सरकार स्थापन केले होते. त्या निवडणुकीत काँग्रेसने 32 तर भाजपाने 31 जागा जिंकल्या होत्या. मायावतींच्या बहुजन समाज पक्षाच्या खात्यात 3 जागा गेल्या होत्या. अन्य पक्षांनी 4 जागांवर विजय मिळवला होता. 
 

Web Title: Election Results Live - In the Uttarakhand BJP, on the road to power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.