योगी आदित्यनाथांविरोधातील ट्विट आयपीएस अधिकाऱ्याला भोवलं
By admin | Published: March 25, 2017 06:16 PM2017-03-25T18:16:12+5:302017-03-25T18:16:12+5:30
आयपीएस अधिकारी हिमांशू कुमार यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात केलेले ट्विट भोवल्याचे दिसत आहे. एका ट्विटमुळे त्यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 25 - आयपीएस अधिकारी हिमांशू कुमार यांना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात केलेले ट्विट भोवल्याचे दिसत आहे. योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्री पदी निवड झाल्यानंतर 'पोलीस कर्मचा-यांना हटवण्याचा घाट' असा आशय असलेले ट्विट आयपीएस अधिकारी हिमांशू कुमार यांना केले होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जातीपातींवरून भेदभाव करण्यात येत असल्याचा आरोप निलंबित आयपीएस अधिकारी हिमांशू कुमार यांनी केला होता. यादव आडनाव असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन किंवा त्यांना हटवण्यासाठी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे, असे ट्विट हिमांशू कुमार यांनी केले होते. शिवाय, जातीच्या नावावर लोकांना दंड करण्यासाठी पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून अधिकाऱ्यांवर दबाव का आणला जात आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. हेच वादग्रस्त ट्विट त्यांना भोवल्याचे बोललं जात आहे.
तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेशिस्त वागणुकीचा ठपका ठेवत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही कुमार यांच्याविरोधात बेशिस्त वागणुकीमुळे कारवाई करण्यात आल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. दरम्यान, योगी आदित्यनाथ यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याविरोधात केलेली ही पहिलीच कारवाई आहे, अशी माहिती आहे. तर दुसरीकडे, हिमांशू कुमार यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीने हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप केला आहे. 2 मार्च रोजी याप्रकरणी त्यांच्याविरोधात बिहारमधील एका न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केल्याचीही माहिती मिळत आहे. दरम्यान, निलंबनाची कारवाई झाल्यानंतर सत्याचा विजय होतो, असे ट्विट हिमांशु कुमार यांनी केले आहे.
UP Police suspends IPS Himanshu Kumar for indiscipline; in his tweets he alleged that seniors are targeting subordinates of particular caste pic.twitter.com/sYD7QWWLXt
— ANI UP (@ANINewsUP) March 25, 2017
Truth alone triumphs.
— Himanshu Kumar IPS (@Himanshu_IPS) March 25, 2017