साध्वी प्रज्ञा आणि इंद्रेश कुमार यांना NIAकडून क्लीन चिट
By admin | Published: April 4, 2017 09:27 AM2017-04-04T09:27:41+5:302017-04-04T09:28:50+5:30
अजमेर बॉम्बस्फोटाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सोमवारी क्लोजर रिपोर्ट दाखल करत साध्वी प्रज्ञा, आरएसएसचे नेते इंद्रेश कुमारसहित 4 जणांना क्लीन चिट दिली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
जयपूर, दि. 4 - अजमेर बॉम्बस्फोटाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सोमवारी क्लोजर रिपोर्ट दाखल करत साध्वी प्रज्ञा, आरएसएसचे नेते इंद्रेश कुमारसहित 4 जणांना क्लीन चिट दिली आहे. 2007 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सांगितले की, "या चारही जणांविरोधात खटला चालवण्यासाठी पुरेशा प्रमाणात पुरावे मिळू शकले नाहीत".
दरम्यान, या प्रकरणात विशेष न्यायालयाने 22 मार्च रोजी भावेश पटेल (39) आणि देवेंद्र गुप्ता(41) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
एनआयएनं विशेष न्यायालयासमोर सादर केलेल्या अहवालात सांगितले की त्यांना इंद्रेश कुमार, साध्वी प्रज्ञा, राजेंद्र आणि रमेश उर्फ प्रिंस यांच्याविरोधात ठोस पुरावे मिळाले नाहीत. दरम्यान, एनआयएकडून मिळालेल्या क्लोजर रिपोर्टवर न्यायालय 17 एप्रिलला आपला निर्णय सांगणार आहे.
दरम्यान,न्यायाधीश दिनेश कुमार गुप्ता यांनी आरोपी सुरेश नायर, रामचंद्र कालसांगरा आणि संदीप डांगे यांना अटक करण्यात तपास यंत्रणाना आलेल्या अपयशापासून ते धीम्या गतीच्या चौकशीमुळे नाराजी व्यक्त केली होती.