भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला बगल देत आपनं उठवला ईव्हीएमचा मुद्दा

By admin | Published: May 9, 2017 04:40 PM2017-05-09T16:40:02+5:302017-05-09T17:07:53+5:30

कपिल मिश्रा यांनी अरविंद केजरीवालांवर लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे दिल्ली विधानसभा आज चांगलीच गाजली आहे.

The issue of EVMs raised by you in the face of corruption | भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला बगल देत आपनं उठवला ईव्हीएमचा मुद्दा

भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला बगल देत आपनं उठवला ईव्हीएमचा मुद्दा

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 9 - आम आदमी पार्टीचे निलंबित आमदार कपिल मिश्रा यांनी अरविंद केजरीवालांवर लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे दिल्ली विधानसभा आज चांगलीच गाजली आहे. आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि अरविंद केजरीवाल यांनी भ्रष्टाचारावर उत्तर देण्याऐवजी आरोपांना बगल देत ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला आहे.

आपच्या अलका लांबा यांनी ईव्हीएमवरून भाजपावर जोरदार टीका केली आहे. त्या म्हणाल्या, ज्या राज्यात फ्रीजमध्ये बीफ ठेवल्यानं एकाची हत्या केली जाते, तिथे ईव्हीएमवर संशय का घेतला जाऊ शकत नाही. आपच्या नेत्यांनी ईव्हीएम टॅम्परिंगसंदर्भात तीनदा माहिती मागवली होती. मात्र निवडणूक आयोगानं त्यांना काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. दिल्लीच्या महापालिका निवडणुकीत जनरेशन थ्री मशिन असतानाही जनरेशन वनच्या मशिनी वापरण्यात आल्या आहेत. अल्का म्हणाल्या, निवडणूक आयोगाकडे पर्याप्त ईव्हीएम मशिन असतानाही राजस्थानमधून ईव्हीएम मशिन मागवाव्या लागल्या आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेरे खराब करून या ईव्हीएम मशिनशी छेडछाड केल्यानंतर भाजपाच्या उमेदवारांना जिंकवण्यात आलं आहे. त्यानंतर आपच्या सौरभ भारद्वाज यांनी एका प्रात्यक्षिकाद्वारे ईव्हीएम मशिनशी छेडछाड करणं शक्य असल्याचं म्हटलं आहे. मात्र त्याच वेळी भाजपाच्या सदस्यांनी केजरीवालांच्या कथित 1 हजार कोटींच्या घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला असता, त्यावर अध्यक्षांनी चर्चा करण्यास नकार दिला.

भाजपाचे विजेंदर गुप्ता दस्तऐवज घेऊन विधानसभेत पोहोचले असता, अध्यक्षांनी पुरावे विधानभवनाच्या पटलावर ठेवण्यास मंजुरी दिली नाही. तसेच भाजपचा स्थगन प्रस्ताव रद्द केला. त्यामुळे गुप्ता विधानसभेच्या बाहेरच उपोषणाला बसले होते. तत्पूर्वी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सहकारी मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतल्याचा सनसनाटी आरोप सरकारमधील बरखास्त करण्यात आलेले मंत्री कपिल मिश्रा यांनी रविवारी केला होता. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी हे आरोप फेटाळले असले, तरी या मुद्द्यावरून भाजपा व इतर पक्ष आक्रमक झाले. केजरीवालांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे.

 

 

Web Title: The issue of EVMs raised by you in the face of corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.