1 हजार कोटी बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : लालूंच्या 22 कार्यालयांवर छापे

By admin | Published: May 16, 2017 10:18 AM2017-05-16T10:18:59+5:302017-05-16T11:45:27+5:30

राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या घरावर आयकर विभागाने छापा मारला आहे.

1,000 crore disproportionate assets case: Raids on 22 offices of Lalu | 1 हजार कोटी बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : लालूंच्या 22 कार्यालयांवर छापे

1 हजार कोटी बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : लालूंच्या 22 कार्यालयांवर छापे

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 16 - राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. नवी दिल्ली, गुडगावमध्ये लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित असलेली लोकं व कंपनी अशा जवळपास 22 ठिकाणांवर आयकर विभागाने कारवाई केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आयकर विभागानं ही कारवाई केली आहे. 1 हजार कोटी रुपयांच्या बेनामी जमिनीचा व्यवहार केल्याचा लालू प्रसाद यादव यांच्यावर आरोप आहे. 
 
बिहारमधील भाजपाचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी लालूंच्या बेहिशेबी संपत्तीसंदर्भात अनेक गौप्यस्फोट केले होते. मात्र नितीशकुमार सरकारनं चौकशीनंतर त्यांना क्लीनचिट दिली होती. सोबत राजदचे नेते प्रेम चंद गुप्ता यांच्यांशी संबंधित असलेल्या कार्यालयांवरही छापेमारी करण्यात आली आहे. एकूणच यामुळे लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी वाढणार असल्याचे दिसत आहे. 
 
 
भाजपा कायद्याचा आधार का घेत नाही - नितीश कुमार 
दरम्यान लालू प्रसाद यादव परिवाराच्या घोटाळ्यांचा आरोपासंदर्भात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पहिल्यांदा उघडपणे भाष्य केलं. प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना एकीकडे ते यादव कुटुंबीयांची बाजू घेताना दिसले तर दुसरीकडे भाजपाकडे लालूंच्या बेहिशेबी मालमत्तेबाबत चौकशी करण्याचीही मागणी केली. नितीश कुमार म्हणाले की, ""लालूंवर लावण्यात आलेले आरोप गंभीर आणि खरे आहेत, असे भाजपाला वाटत असल्यास भाजपा कायद्याचा आधार का घेत नाही?"".  
 
शिवाय, ""लालूंच्या बेहिशेबी संपत्ती प्रकरणात कोणत्याही प्रकारे तथ्य असल्यास भाजपाने कायद्याचा आधार घ्यावा. या प्रकरणाचा बिहारसोबत काहीही संबंध नाही आणि यात आपली कोणतीही भूमिका नाही"", असेही नितीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. 
... तर मग चौकशी कशासाठी - तेजस्वी यादव
तर दुसरीकडे भाजपाकडून करण्यात आलेल्या आरोपांबाबत चौकशीसंदर्भातील प्रश्नावर लालू प्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव प्रसिद्धी माध्यमांवर  संतापले. तेजस्वी म्हणाले की, सुशील मोदींनी लावलेले आरोप प्रसिद्धी माध्यमं सत्य असल्याचे स्वीकारतात आणि राष्ट्रीय जनता दलाकडून करण्यात आलेले आरोपांसंदर्भात सुशील मोदी यांना प्रश्नही विचारत नाही. 
 
याआधी मंगळवारी सकाळी कांग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्थी यांच्या निवासस्थानावर सीबीआयनं छापेमारी केली. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात कार्थी चिदंबरम आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या एका कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. कार्थी चिदंबरम यांच्याशी संबंधित असलेल्या या कंपनीवर फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. 
 
एअरसेल-मॅक्सिस आर्थिक व्यवहार प्रकरणी सुद्धा त्यांची चौकशी सुरू आहे. अॅडव्हानटेज स्ट्रॅटजिक कन्सलटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी त्यांचे संचालक आणि कार्थी चिदंबरमला ईडीने कारणेदाखवा नोटीस बजावली होती. एअरसेल-मॅक्सिस करारात आर्थिक गैरव्यवहार असल्याचे आरोप झाल्यानंतर . अॅडव्हानटेज स्ट्रॅटजिक कन्सलटिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ईडीच्या रडारवर आली. या पार्श्वभूमीवर चिदंबरम यांच्या निवासस्थानासहीत चेन्नईतील 14 जागांवर छापेमारी करण्यात आली.
 

Web Title: 1,000 crore disproportionate assets case: Raids on 22 offices of Lalu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.