"त्या" साधूचा दावा, तरूणीने नाही मी स्वतःच कापलं गुप्तांग

By admin | Published: May 21, 2017 10:36 AM2017-05-21T10:36:29+5:302017-05-21T12:29:20+5:30

केरळमध्ये अनेक वर्षांपासून सातत्याने बलात्कार करणाऱ्या नराधम साधूचं एका 23 वर्षीय तरुणीने गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना काल उघडकीस आली होती.

"That" the sadhu claimed, not by the young man, I cut myself off | "त्या" साधूचा दावा, तरूणीने नाही मी स्वतःच कापलं गुप्तांग

"त्या" साधूचा दावा, तरूणीने नाही मी स्वतःच कापलं गुप्तांग

Next

ऑनलाइन लोकमत

कोल्लम, दि. 21- केरळमध्ये अनेक वर्षांपासून सातत्याने बलात्कार करणाऱ्या नराधम साधूचं एका 23 वर्षीय तरुणीने गुप्तांग कापल्याची धक्कादायक घटना काल उघडकीस आली होती. या प्रकरणात आरोपी साधूने भलताच दावा केला आहे.आरोपी साधूने त्या तरूणीने नाही आपण स्वतःच आपलं गुप्तांग कापल्याचा दावा केला आहे.  

आरोपी साधूने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये आपण स्वतःच आपलं गुप्तांग कारण ते निरूपयोग होतं असं म्हटलं आहे. शरीराचा तो भाग माझ्या काही कामाचा नव्हता म्हणून मी तो भाग कापून टाकला असं हा साधू म्हणाला. आज तकने याबाबत वृत्त दिलं आहे. 

 
आरोपी श्रीहरी उर्फ गणेशानंद स्वामी पीडित तरुणीवर लहान म्हणजेच शाळेत असल्यापासून तिच्यावर बलात्कार करत होता. या भयाण परिस्थितीतून आपली सुटका करुन घेण्याच्या हेतूने तरुणीने अखेर शुक्रवारी आपल्यावर बलात्कार करणा-या या साधूचं गुप्तांगच कापून टाकल्याची घटना समोर आली होती. 
 
 
यानंतर तरुणीने स्वत: पोलिसांना फोन करुन या घटनेची माहिती दिली. सुडापोटी आपण हे केलं असून स्वसंरक्षणासाठी हे पाऊल उचललं असल्याची कबुली तिने पोलिसांकडे दिली आहे. पीडित तरुणीचे पालक या स्वामीचे भक्त होते. कोल्लम येथील एका आश्रमात या साधूचं वास्तव्य होतं. 
 
स्वामीची परिस्थिती सध्या नाजूक असून त्याला मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 
 
"एक साधू आपल्यावर बलात्कार करत असल्याचं मी सांगितलं असतं तर कुणीच विश्वास ठेवला नसता. त्यामुळेच हे पाऊल उचलण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय माझ्यासमोर नव्हता", असं पीडित तरुणीने सांगितलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
पीडित तरुणीने दिलेल्या माहितीनुसार तिच्या आईला स्वामीच्या या अश्लील चाळ्यांची कल्पना होती. मात्र तरीही ती गप्प राहिली आणि स्वामीला आपलं लैंगिक शोषण करुन देत होता. अनेकदा स्वामी घरी येऊन बलात्कार करत असे. शुक्रवारी स्वामी येणार असल्याची माहिती असल्याने पीडित तरुणीने आधीच तयारी करत गुप्तांग कापण्याच्या हेतूने चाकू जवळ ठेवला होता.
 
पोलिसांनी स्वामीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसंच पीडित तरुणीवर अत्याचार सुरु झाला तेव्हा ती अल्पवयीन होती त्यामुळे बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा (पोस्को) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

Web Title: "That" the sadhu claimed, not by the young man, I cut myself off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.