मोदी-ट्रम्प जवळीक विध्वंसक सिद्ध होईल, चीनचा तीळपापड

By admin | Published: June 27, 2017 01:32 PM2017-06-27T13:32:10+5:302017-06-27T16:23:18+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऐतिहासिक भेटीमुळे अपेक्षेप्रमाणे चीनच्या पोटात गोळा उठला आहे.

Modi-Trump will prove intimidating thieves, China's Tilapand | मोदी-ट्रम्प जवळीक विध्वंसक सिद्ध होईल, चीनचा तीळपापड

मोदी-ट्रम्प जवळीक विध्वंसक सिद्ध होईल, चीनचा तीळपापड

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ऐतिहासिक भेटीमुळे अपेक्षेप्रमाणे चीनच्या पोटात गोळा उठला आहे. ट्रम्प आणि मोदी यांची जवळीक विध्वंसक सिद्ध होऊ शकते, असं चीनमधील वृत्तपत्र "ग्लोबल टाइम्स"नं भारताला बजावले आहे. तसंच अमेरिका म्हणजे जपान नव्हे याची आठवणही "ग्लोबल टाइम्स" या वृत्तपत्रातून भारताला करून दिली आहे.
 
आपल्या अमेरिकेच्या दौ-यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मोदी-ट्रम्प भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष होते. या भेटीदरम्यान दोन्ही देशांनी दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या सुरक्षित ठिकाणांचा मिळून खात्मा करण्याचा संकल्प केला आहे. मोदींच्या या दौ-यामुळे विशेष करुन चीनची गैरसोय झाल्याचे दिसत आहे. तीळपापड झालेल्या चीननं वृत्तपत्र "ग्लोबल टाइम्स"च्या माध्यमातून म्हटले आहे की, अमेरिका भारताचा एखाद्या प्याद्याप्रमाणे चीनविरोधात वापर करत आहे. अमेरिकेनं कधीही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताच्या स्थानाबाबत कोणतीही ठोस स्वरुपातील अशी भूमिका मांडलेली नाही. 
 
""ही मैत्री म्हणजे अमेरिकेचा सापळा""   
चीनचे सरकारी वृत्तपत्र "ग्लोबल टाइम्स"मध्ये छापण्यात आलेल्या एका लेखात असेही मांडण्यात आले आहे की, अमेरिकेनं म्हटलं होतं की भारत अमेरिकेचा खरा मित्र आहे. यावरुन हे स्पष्ट होत आहे की अमेरिका चीनवर निशाणा साधण्यासाठी नवी दिल्लीचा वापर करणार.  आता भारताला या गोष्टीवर अभिमान वाटू शकतो की आपण अमेरिकेचा एक महत्त्वाची सहकारी बनत आहोत. मात्र अमेरिकेकडून हा एक सापळा आहे. ज्यात भारताचा केवळ वापर केला जात आहे. 
 
"ग्लोबल टाइम्स"मध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या कार्याकाळात भारताला सुरक्षा परिषदेत स्थान मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, आश्वासन प्रत्यक्षात साकार झालं?, नाही. पण मोदींच्या या दौ-यानंतर ट्रम्प भारताला स्थान देणार का, हादेखील प्रश्न आहे. शिवाय, ट्रम्प पाकिस्तानवर दहशतवादी संघटनांसंदर्भात पाकिस्तानवर दबाव आणतील?. तसं पाहिलं तर याचं उत्तर नकारात्मक आहे. 
 
""जपान-ऑस्ट्रेलियासारखा मित्र नाही भारत""
चीनचा उदय होत असल्याच्या कारणामुळे भारत आणि अमेरिकेत जवळीक निर्माण होत आहे. मात्र, जपान जितके चीनच्या जवळ आहेत, तेवढा भारत नाही. अमेरिका केवळ चीनच्या कारणामुळे भारताजवळ येत आहे. 
 
 
 
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत गेले होते. सोमवारी रात्री उशीरा साधारण 1 वाजून 10 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हाइट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींना "सच्चा दोस्त" म्हणणा-या डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी व अमेरिकेच्या फर्स्ट लेडी  मेलेनिया ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचं व्हाइट हाऊसमध्ये उत्साहात स्वागत केलं. व्हाइट हाउसमध्ये प्रवेश करताना त्यांनी एकमेकांची विचारपूस केली. व्हाइट हाउसमध्ये झालेल्या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. संयुक्त पत्रकार परिषदेत दोन्ही नेत्यांनी दहशतवादाला लक्ष्य केलं. 

 

एक नजर डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेतील महत्त्वाच्या मुद्यावर-

 

1- मोदी महान पंतप्रधान – ट्रम्प 

द्विपक्षीय चर्चा सुरू होण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महान पंतप्रधान असा उल्लेख करत तुम्ही अमेरिकेत येणं ही सन्मानाची बाब असल्याचं म्हटलं. ट्रम्प म्हणाले, मोदी महान पंतप्रधान आहेत, माझं त्यांच्यासोबत बोलणं होत असतं, मी त्यांच्याविषयी वाचतही असतो. ते अत्यंत चांगलं काम करत आहेत, भारताची अनेक बाबतीत प्रगती होत आहे,  त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो.
 
2- भारत अमेरिकाचा सच्चा दोस्त- ट्रम्प
 
 
या वर्षी भारत स्वातंत्र्यांचं 70 वं वर्ष साजरं करणार आहे, याबाबत मी भारताच्या जनतेचं अभिनंदन करतो. राष्ट्रपती निवडणुकीच्या प्रचारावेळी मी भारत अमेरिकेचा खरा मित्र असल्याचं म्हटलं होतं आणि ते खरं ठरलं आहे. 
 
3- मोदी आणि मी सोशल मीडियातही लीडर- ट्रम्प
 
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाच्या पंतप्रधानाचं स्वागत करणं हा माझ्यासाठी सन्मान आहे. मोदी आणि मी सोशल मीडियातही जगाचे लीडर आहोत असं संयुक्त पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच ट्रम्प म्हणाले.  
 
4- भारत जगातील सर्वाधिक जलद वाढ होणारी अर्थव्यवस्था- ट्रम्प
 
भारत आणि अमेरिकेच्या संविधानात "We The People" हे तीन शब्द समान आहेत. आजच्या भेटीनंतर मी म्हणू शकतो की भारत आणि अमेरिकेमध्ये इतके चांगले संबंध कधीच नव्हते. पीएम मोदी तुम्ही मिळवलेल्या यशाबद्दल मी तुम्हाला सलाम करतो. भारत जगातील सर्वाधिक जलद वाढ होणारी अर्थव्यवस्था आहे. 
 
5- एकत्र मिळून दहशतवादाचा खात्मा करणार- ट्रम्प
 
दोन्ही देशांना दहशतवादाच्या राक्षसाने नुकसान पोहोचवलं आहे. कट्टरपंथी विचार संपवण्यासाठी कटीबद्ध आहोत. आम्ही इस्लामिक दहशतवादाचा खात्मा करू"" असं संयुक्त निवेदनामध्ये म्हटलं आहे. 
 
6- हा 125 कोटी भारतीयांचा सन्मान- मोदी
 
ट्रम्प यांच्याकडून उत्साहात झालेल्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदींनी ट्रम्प आणि त्यांच्या पत्नीचे आभार मानले. माझं स्वागत म्हणजे 125 कोटी नागरिकांचा सन्मान असल्याचं मोदी म्हणाले.
 
7- दोन्ही देश एकमेकांचे चांगले सहकारी - मोदी
 
पंतप्रधान मोदी म्हणाले, तुम्ही जगातील सर्वात जुनी लोकशाही आहात तर आम्ही जगातील सर्वात मोठी लोकशाही. या परंपरेला एकत्र पुढे नेऊया. भारत-अमेरिका एकत्र येऊन जगाला काहीतरी देऊ शकतो. या दिशेने तुमचे नेतृत्व महतावाची भूमिका बजावेल. भारत अमेरिकेसाठी आणि अमेरिका भारतासाठी चांगले सहकारी आहे.
 
8- दहशतवादाविरोधात लढणं प्राथमिकता- मोदी
 
दहशतवादासारख्या गंभीर समस्येपासून आपल्या समाजाची रक्षा करणं ही आमच्यासाठी प्राथमिकता आहे, असं मोदी म्हणाले. दोन्ही देशांमध्ये दहशतवादाच्या मुद्यावर इंटेलिजन्सची माहिती देण्यावरही सहमती झाली आहे. 
 
9- दोन्ही देश विकासाचे ग्लोबल इंजिन- मोदी
 
पीएम मोदी म्हणाले, आमच्यात झालेली चर्चा सर्वार्थाने अत्यंत महत्वाची होती. अमेरिका आणि भारत हे दोन्ही देश म्हणजे विकासाचे ग्लोबल इंजिन आहे. 

 

10-  ट्रम्प यांची मुलगी भारतात येणार, ट्रम्प यांनाही भारतात येण्याचं निमंत्रण- मोदी 
ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी जागतिक उद्योजकतेचे नेतृत्व करण्यासाठी भारतात यावे असे आमंत्रण मोदी यांनी इवांका यांना दिले आहे. त्यांनी ते स्वीकारले असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले. राष्ट्रपतींनी सहकुटुंब भारतात येण्याचं मी त्यांना निमंत्रण देतो, त्यांचं स्वागत करण्याची मी वाट पाहत आहे, असं म्हणत मोदींनी ट्रम्प यांनाही निमंत्रण दिलं. ट्रम्प यांनी मोदींचं निमंत्रण स्वीकारलं असून अजून नेमकी तारीक नक्की झालेली नाही.  

Web Title: Modi-Trump will prove intimidating thieves, China's Tilapand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.