भारतात लष्कर हॅण्डलर उपस्थित, करु शकतो आत्मघाती हल्ले

By admin | Published: June 2, 2017 11:17 AM2017-06-02T11:17:54+5:302017-06-02T11:33:56+5:30

पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने प्रशिक्षण दिलेला एक हॅण्डलर भारतात घुसला असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे

In India, Army handlers can attend, Suicidal attacks can do | भारतात लष्कर हॅण्डलर उपस्थित, करु शकतो आत्मघाती हल्ले

भारतात लष्कर हॅण्डलर उपस्थित, करु शकतो आत्मघाती हल्ले

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - पंजाब आणि जम्मू काश्मीर पोलिसांसोबत सर्वच केंद्रीय सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाने प्रशिक्षण दिलेला एक हॅण्डलर भारतात घुसला असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. या हॅण्डलरला वर्दळीची ठिकाणं तसंच सैन्याच्या ठिकाणांवर हल्ला करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या हॅण्डलरचं नाव हंजिया अनान असं आहे. 
 
कुठे कुठे आहे धोका - 
गुप्ततर यंत्रणांच्या माहितीनुसार श्रीनगरमधील अनेक ठिकाणं, जम्मूमधील विजयपूर रेल्वे स्थानक, सांबा आणि बारी ब्रम्हाना येथील औद्योगिक ठिकाणं, जम्मू दंत विद्यालयाचं हॉस्टेल यांच्याव्यतिरिक्त भारतीय लष्कराच्या छावणीजवळील परिसर आणि पंजाबमधील गुरदासपूर आणि दिनाननगर दहशतवादी अनानच्या टार्गेटवर आहे. सुरक्षा यंत्रणा अद्यापपर्यंत अनानचा शोध घेऊ शकलेलं नाही. त्याच्या ठावठिकाण्याचा काहीच सुगावा त्यांना लागलेला नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपुर्वीच तो भारतात दाखल झाला असून स्थानिक दहशतवादी त्याला मदत करत आहेत. 
 
सुरक्षेची चोख व्यवस्था - 
दंत विद्यालयात गतवर्षी अनेक आंदोलनं झाली होती. टी -20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिजकडून भारताचा पराभव झाल्यानंतर तिरंगा जाळल्याने याठिकाणी आंदोलनं झाली होती. बारी ब्रम्हाना आणि सांबा औद्योगिक परिसराबद्दल बोलायचं गेल्यास, या ठिकाणी हल्ला करत दहशतवादी जम्मू काश्मीरमधील आर्थिक बाजू दुबळी करण्याचा प्रयत्न करतील. मात्र दुसरीकडे हा हॅण्डलर एकटाच आला आहे की सोबत अजून दहशतवादी आहेत हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. हॅण्लडरची माहिती मिळताच संवेदनशील ठिकाणी कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सोबतच त्याचा शोध घेणंही सुरु आहे. 
 
काही दिवसांपुर्वी दहशतवाद्यांनी गुरुदासपूर, उधमपूर आणि पठाणकोटमध्ये हल्ला केला होता. यामुळेच पंजाब पोलिसांना हाय अलर्टवर राहण्यास सांगण्यात आलं आहे. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय सीमारेषा आणि नियंत्रण रेषेवरही लष्कराने दहशतवाद्यांना रोखण्यासाठी तयारी केला आहे. उन्हाळ्यात बर्फ वितळू लागल्यानंतर पाकिस्तान दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतो. लवकरच सुरु होणा-या अमरनाथ यात्रेवरही दहशतवाद्यांची नजर आहे.
 
 

Web Title: In India, Army handlers can attend, Suicidal attacks can do

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.