काश्मीरमध्ये दैनंदिन व्यवहार विस्कळीत

By admin | Published: June 10, 2017 12:25 AM2017-06-10T00:25:00+5:302017-06-10T00:25:00+5:30

युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ फुटीरवाद्यांनी शुक्रवारी बंदचे आवाहन केल्यावर प्रशासनाने नागरिकांच्या हालचालींवर बंधने घातली.

Day-to-day affairs of Kashmir disrupted | काश्मीरमध्ये दैनंदिन व्यवहार विस्कळीत

काश्मीरमध्ये दैनंदिन व्यवहार विस्कळीत

Next

श्रीनगर : युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ फुटीरवाद्यांनी शुक्रवारी बंदचे आवाहन केल्यावर प्रशासनाने नागरिकांच्या हालचालींवर बंधने घातली. काश्मीरच्या अनेक भागांत दैनंदिन जीवन विकळीत झाले. संपूर्ण खोऱ्यात शाळा आणि महाविद्यालये व अनेक भागांत दुकाने, कार्यालये तसेच व्यापारी केंद्रे बंद होती.
शोपियान व श्रीनगरमधील काही भागांत प्रशासनाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी लोकांच्या येण्याजाण्यावर निर्बंध घातले. राष्ट्रीय तपास संस्थेने खोऱ्यात घातलेले छापे आणि सुरक्षादले व नागरिकांत मंगळवारी गनपोरा शोपियान येथे चकमकीत आदिल फारूक (१९) मारला गेल्याच्या निषेधार्थ फुटीरवाद्यांनी बंदचे आवाहन केल्याच्या पार्श्वभूमीवर ही बंधने होती.

Web Title: Day-to-day affairs of Kashmir disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.