सावधान! "जिओ"बाबतचं "ते" वृत्त म्हणजे निव्वळ अफवा

By admin | Published: June 14, 2017 01:59 PM2017-06-14T13:59:43+5:302017-06-14T14:04:47+5:30

भारतीय दूरसंचार क्षेत्रात धमाल उडवून दिल्यानंतर रिलायन्स जिओ कंपनी आता DTH सर्विस सुरू करणार असून त्यासाठी नोंदणी सुरू झाल्याचं वृत्त सोशल मीडियावर

Be careful! The "THAT" issue of "Xiao" is a pure rumor | सावधान! "जिओ"बाबतचं "ते" वृत्त म्हणजे निव्वळ अफवा

सावधान! "जिओ"बाबतचं "ते" वृत्त म्हणजे निव्वळ अफवा

Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - एकाहून एक सरस ऑफर आणून धमाका करणारी कंपनी रिलायन्स जिओ आणखी एक धमाका करणार असल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. भारतीय दूरसंचार क्षेत्रात धमाल उडवून दिल्यानंतर रिलायन्स जिओ कंपनी आता DTH सर्विस सुरू करणार असून त्यासाठी नोंदणी सुरू झाल्याचं वृत्त सोशल मीडियावर फिरत आहे. 
 
सिमकार्डप्रमाणे सेट टॉप बॉक्ससाठीही कंपनीकडून वेलकम ऑफर देण्यात येणार असून वेलकम ऑफरमध्ये प्रमोशन करण्यासाठी कंपनी 6 महिन्यांसाठी सर्विस फ्री देणार असल्याचा एक स्क्रिनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे. 
या स्क्रिनशॉटनुसार, या सर्विसमध्ये जिओ 432 चॅनलची सेवा मिळणार असून त्यापैकी 350 पेक्षा जास्त एसडी चॅनल(स्टॅन्डर्ड डेफिनेशन) आणि 50 पेक्षा जास्त एचडी चॅनल (हाय डेफिनेशन) चॅनल पाहता येतील अशी माहिती आहे.
 
 
मात्र, सोशल मीडियावर फिरत असलेलं हे वृत्त म्हणजे निव्वळ अफवा आहे. जिओ डीटीएच सर्विस अजून सुरू झालेली नाही. ज्यावेळी ही सेवा सुरू होईल ग्राहकांना योग्य माध्यमातून याबाबत माहिती दिली जाईल असं जिओकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
  

जिओ धमाका! आता येणार Jio चा स्वस्त 4G लॅपटॉप-

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जिओ लवकरच 4G सिम कार्ड स्लॉट असलेला लॅपटॉप लॉन्च करणार आहे. जिओच्या या लॅपटॉपमध्ये 4G सिम कार्ड स्लॉट असल्याने इंटरनेटचा वापर यावर सहजशक्य होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Foxconn कंपनी हे लॅपटॉप बनवणार आहे. 13.3 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले यामध्ये असणार तसेच व्हिडीओ कॉलिंगसाठी एचडी कॅमेरा असणार आहे. याशिवाय स्लिम कि-बोर्ड असणार आहे. लॅपटॉपमध्ये इंटेल पेंटियम क्वाड-कोअर प्रोसेसर, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मेमरी असू शकते. 1.2 किलोग्राम इतकं या लॅपटॉपचं वजन असण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीकडून याबबात अधिकृत माहिती अजून देण्यात आलेली नाही.

Web Title: Be careful! The "THAT" issue of "Xiao" is a pure rumor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.