योगाने संपूर्ण जगाला भारताबरोबर जोडले - पंतप्रधान मोदी
By Admin | Published: June 21, 2017 07:40 AM2017-06-21T07:40:01+5:302017-06-21T09:45:24+5:30
भारताबाहेर योगासने प्रचंड लोकप्रिय असून योगासनांमुळे संपूर्ण जग भारताबरोबर जोडले जात आहे.
ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 21 - आज योगा अनेकांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. भारताबाहेर योगासने प्रचंड लोकप्रिय असून योगासनांमुळे संपूर्ण जग भारताबरोबर जोडले जात आहे. मागच्या तीनवर्षात अनेक नव्या योगा संस्था आकाराला आल्याचा आनंद आहे. योग शिक्षकांची मागणी वाढत चालली आहे अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगासनांचे महत्व विषद केले. ते तिस-या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने लखनऊमध्ये बोलत होते.
पंतप्रधान मोदी यंदा लखनऊमध्ये योग दिवस साजरा करत असून, उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर मोदीं स्वत: योगासने करत आहेत. फक्त शारीरीक तंदुरुस्ती नव्हे निरोगी शरीस्वास्थय महत्वाचे आहे. योगामुळे आरोग्याची खात्री मिळते. योगासने करण्यासाठी जास्त खर्चही करावा लागत नाही. जेवणामध्ये जसे मीठ लागते तसेच योगाला आपल्या आयुष्याचा एक भाग बनवा असे आवाहन मोदींनी केले.
लखनऊच्या रमाबाई आंबेडकर मैदानावर हा कार्यक्रम होत आहे. आंबेडकर मैदानावरील या योग कार्यक्रमामध्ये 50 हजार नागरीक सहभागी झाले आहेत. योगाच्या माध्यमातून भारत नवी उंची गाठू शकतो असे मत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.
PM Narendra Modi leads #InternationalYogaDay celebrations in Lucknow pic.twitter.com/JCzAGfwNQf
— ANI UP (@ANINewsUP) June 21, 2017