दार्जिलिंगमध्ये ट्युबलाइट मोर्चा

By admin | Published: June 27, 2017 03:42 PM2017-06-27T15:42:49+5:302017-06-27T15:57:28+5:30

गोरखा जनमुक्ती मोर्चाने आज दार्जिलिंगमध्ये "ट्युबलाईट" मोर्चा काढला.

Tubalight Front in Darjeeling | दार्जिलिंगमध्ये ट्युबलाइट मोर्चा

दार्जिलिंगमध्ये ट्युबलाइट मोर्चा

Next

ऑनलाइन लोकमत

दार्जिलिंग, दि. 27-  गेल्या काही दिवसांपासून दार्जिलिंगमध्ये गोरखा जनमुक्ती मोर्चाचं आंदोलन सुरू आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी गोरखा समितीने सुरू केलेल्या आंदोलनला हिंसक वळणही लागलं. पण आता आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी दार्जिलिंगमध्ये वेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं. गोरखा जनमुक्ती मोर्चाने आज दार्जिलिंगमध्ये "ट्युबलाईट" मोर्चा काढला. वेगळ्या राज्याची मागणी करणाऱ्या गोरखा जनमुक्ती मोर्चाने हा मोर्चा काढला होता. यावेळी आंदोलकांनी आपल्या पाठीवर ट्युबलाइटही फोडल्या.
 
गोरखा जनमुक्ती मोर्चाने स्वतंत्र गोरखालँड राज्याची मागणी करण्यासाठी आपलं आंदोलन आणखी तीव्र केलं आहे. गोरखा जनमुक्ती मोर्चाने दार्जिलिंगमधील इतर भागातही गोरखालँड स्वायत्ता करार जाळण्याचा इशारा दिला आहे. मंगळवारी झालेल्या "ट्युबलाइट" मोर्चातही करार जाळण्यात आला. त्याशिवाय गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या युवा आघाडीच्यावतीने आमरण उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा या आंदोलना दरम्यान देण्यात आला. 
 
दार्जिलिंगमध्ये सुरु असलेलं हे आंदोलन दिवसेंदिवस हिंसक वळण घेतं आहे. याआधी 17 जून रोजी आंदोलनामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याला भोसकल्याची घटना घडली होती. तसंच आंदोलकांनी एक पोलीस व्हॅनही जाळली. गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या आंदोलकांनी पोलिसांवर दगड, पेट्रोल बॉम्ब तसेच बाटल्या फेकल्यामुळे पोलिसांना लाठीमार तसेच अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून आंदोलकांना आवरावं लागलं. इंडिया रिझर्व्ह बटालियनचे असिस्टंट कमांडंट किरण तमांग यांना आंदोलकांनी भोसकल्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. या तणावपूर्व परिस्थितीमुळे दार्जिलिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. 
 
स्वतंत्र गोरखा लॅण्डच्या मागणीसाठी ८ जूनपासून आंदोलन करीत असलेल्या जीजेएम कार्यकर्त्यांनी सिंगमारी येथील पक्ष मुख्यालयापासून निषेध मोर्चा काढला होता. आपण आंदोलकांशी चर्चेला तयार आहोत. मात्र, राज्यघटनेचं उल्लंघन केलं जाऊ शकत नाही, असं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. सरकारला बदनाम करण्यासाठी काही उपद्रवी शक्ती मुद्दाम आंदोलनास चिथावत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, सद्य:स्थितीविषयी राज्य सरकारकडून अहवाल आल्याखेरीज केंद्र सरकार सुरक्षा दलांची जादा कुमक पाठविणार नाही, अशी भूमिका केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतली होती. 
 
 
 

Web Title: Tubalight Front in Darjeeling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.