संसदेत जीएसटी लाँचिंगची बुधवारी मेगा रिहर्सल संपन्न

By Admin | Published: June 28, 2017 05:52 PM2017-06-28T17:52:10+5:302017-06-28T17:52:10+5:30

वस्तू व सेवा कर (जीएसटी) चे ऐतिहासिक लाँचिंग ३0 जूनच्या मध्यरात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमधे होणार आहे.

Mega rehearsal concludes on GST launch in Parliament | संसदेत जीएसटी लाँचिंगची बुधवारी मेगा रिहर्सल संपन्न

संसदेत जीएसटी लाँचिंगची बुधवारी मेगा रिहर्सल संपन्न

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 28 - वस्तू व सेवा कर (जीएसटी) चे ऐतिहासिक लाँचिंग ३0 जूनच्या मध्यरात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमधे होणार आहे. या लाँचिंग सोहळयाची रिहर्सल बुधवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमधे संपन्न झाली. तथापि ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या संसदीय पक्षाने जीएसटीला विरोध करण्यासाठी ३0 जूनच्या ऐतिहासिक सोहळयावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे, असे पक्षप्रवक्ते डेरेक ओब्रायन यांनी पत्रकारांना सांगितले. 

वस्तू व सेवा कराच्या अमलबजावणीची पूर्वतयारी मोदी सरकारने पूर्ण केली आहे. सेंट्रल बोर्ड आॅफ एक्साईज अँड कस्टम्सच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार देशात ही ऐतिहासिक करसुधारणा लागू करण्याआधी जीएसटी शी संबंधित साऱ्या अडचणी दूर करणे व त्वरित फिडबॅक मिळवणे यासाठी केंद्र व राज्य सरकारांच्या अधिकाऱ्यांच्या मदतीसाठी एक रिसोर्स सेंटर (अ‍ॅक्शन वॉर रूम) तयार तयार करण्यात आले आहे. ही अ‍ॅक्शन वॉर रूम सिंगल विंडोच्या धर्तीवर सकाळी ८ ते रात्री १0 वाजेपर्यंत काम करणार आहे. अनेक फोन लाईन्ससह कम्प्युटरची अद्ययावत यंत्रणा त्यासाठी तैनात करण्यात आली आहे.

वॉर रूममधे उपस्थित अधिकारी, तज्ज्ञांच्या मदतीने जीएसटीशी संबंधित साऱ्या प्रश्नांची उत्तरे देतील. अर्थमंत्री अरूण जेटलींनी मंगळवारीच स्पष्ट केले की कोणत्याही नव्या यंत्रणेच्या अमलबजावणीत सुरूवातीचा काही काळ अडचणी येऊ शकतात.

जीएसटीतही त्या येतील मात्र कालांतराने सारे काही सुरळीत होईल. स्वातंत्र्यानंतर प्रथमच १६ कर समाप्त करून जीएसटी अस्तित्वात येत आहे. जम्मू काश्मीर वगळता देशातल्या तमाम राज्यांच्या विधानसभांमधे प्रस्तुत कायदा मंजूर झाला आहे. नव्या करप्रणालीत करांचे दर आणि अनेक वस्तंूच्या किमती खाली येणार आहेत. साहजिकच त्याचा फायदा साऱ्या देशाला होणार आहे.

Web Title: Mega rehearsal concludes on GST launch in Parliament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.