‘जीएसटी यशस्वी होेणार नाही’ काँग्रेसने जारी केला मोदींचा जुना व्हिडीओ

By admin | Published: July 1, 2017 01:06 AM2017-07-01T01:06:19+5:302017-07-01T01:06:19+5:30

जीएसटीची अंमलबजावणी सुरू होत असताना काँग्रेसने शुक्रवारी एक व्हिडीओ जारी केला आहे. यात मोदी सांगत आहेत की,

'GST will not succeed', Congress releases Modi's old video | ‘जीएसटी यशस्वी होेणार नाही’ काँग्रेसने जारी केला मोदींचा जुना व्हिडीओ

‘जीएसटी यशस्वी होेणार नाही’ काँग्रेसने जारी केला मोदींचा जुना व्हिडीओ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : जीएसटीची अंमलबजावणी सुरू होत असताना काँग्रेसने शुक्रवारी एक व्हिडीओ जारी केला आहे. यात मोदी सांगत आहेत की, अपेक्षित पायाभूत सुविधांशिवाय जीएसटी यशस्वी होऊ शकत नाही. या व्हिडीओत मोदी असे म्हणताना दिसत आहेत की, जीएसटीबाबत हे भाजपाचे आणि गुजरात सरकारचे मत आहे की, जीएसटी कधी यशस्वी होऊ शकत नाही.
काँग्रेसने म्हटले आहे की, मोदीजी आपले स्वत:चे शब्द आपण किती लवकर विसरत आहात. पायाभूत सुविधा विकसित करण्यापूर्वीच आपण जीएसटीची अंमलबजावणी का करीत आहात?
काँग्रेसने टिष्ट्वट केले की, मोदी व भाजपा जीएसटीबाबत वास्तविक अशा प्रकारे विचार करीत आहेत. करदात्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर नेटवर्क तयार होत नाही तोपर्यंत जीएसटी लागू करणे शक्य नाही, असेही मोदी क्लिपमध्ये म्हणताना दिसताहेत.

Web Title: 'GST will not succeed', Congress releases Modi's old video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.