होय, मी भारतात दहशतवादी हल्ले केले - सय्यद सलाहुद्दीन

By admin | Published: July 3, 2017 10:22 AM2017-07-03T10:22:18+5:302017-07-03T12:13:18+5:30

हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीनने एका पाकिस्ताने टीव्ही चॅनलवर बोलताना भारतात दहशतवादी हल्ले केल्याची कबुली दिली आहे.

Yes, I made terrorist attacks in India - Sayyid Salahuddin | होय, मी भारतात दहशतवादी हल्ले केले - सय्यद सलाहुद्दीन

होय, मी भारतात दहशतवादी हल्ले केले - सय्यद सलाहुद्दीन

Next

  ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. 3 - हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाहुद्दीनने एका पाकिस्ताने टीव्ही चॅनलवर बोलताना भारतात दहशतवादी हल्ले केल्याची कबुली दिली आहे. हिजबुलने आतापर्यंत काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. भारतात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे आपला हात असल्याची सलाहुद्दीनने पाकिस्तानी वृत्तवाहिनीवर कबुली दिली आहे. 
 
मागच्या आठवडयात अमेरिकेने सय्यद सलाहुद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केले. जम्मू-काश्मीरला भारतापासून स्वतंत्र करण्यासाठी आपला सशस्त्र लढा यापुढेही सुरुच राहिल असे सलाहुद्दीनने शनिवारी सांगितले. भारतापासून काश्मीर अलग केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे सलाहुद्दीन शनिवारी मुझफ्फराबादमध्ये पत्रकारपरिषदेत म्हणाला. मुझफ्फराबाद पाकव्याप्त काश्मीरची राजधानी आहे. 
 
आम्ही फक्त भारतीय सुरक्षा पथकांना लक्ष्य करतो. इसिस किंवा अलकायदा काश्मीरमध्ये सक्रीय नाही असे त्याने सांगितले. काश्मीर खो-याला भारतीय सैन्याची दफनभूमी बनवू अशी पोकळ धमकी त्याने मागच्यावर्षी दिली होती. अमेरिकेने सय्यद सलाहुद्दीनला दहशतवादी म्हणून घोषित केल्याच्या कारवाईचा निषेध करत त्यानं सांगितले की,  काश्मीर मुद्यावर सशस्त्र संघर्षाला आपलं समर्थन देत राहू. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाद्वारे त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्याचा निर्णयाला मूर्खपणा असल्याची वायफळ बडबड सलाहुद्दीननं केली आहे. 
 
पुढे तो असंही म्हणाला की, अमेरिकेच्या दौ-यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आलेली ही भेट होती. पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादमध्ये सलाहुद्दीननं पत्रकार परिषद घेत म्हटले की, मला दहशतवादी म्हणून घोषित करण्यासंदर्भात पुरावा म्हणून एका घटनेचा उल्लेखही करू शकत नाही. या मूर्खपणाच्या निर्णयामुळे आमचा विश्वासाला तडा जाणार नाही. आम्ही काश्मीर मुद्यावर जिहाद सुरू ठेवणार.
 

Web Title: Yes, I made terrorist attacks in India - Sayyid Salahuddin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.