बीअर आरोग्यदायी पेय; आंध्र प्रदेशच्या मंत्र्यांचं विधान

By admin | Published: July 5, 2017 08:44 AM2017-07-05T08:44:54+5:302017-07-05T11:36:58+5:30

बीअर हे आरोग्यदायी पेय आहे. असं वक्तव्य आंध्र प्रदेशचे उत्पादन शुल्कमंत्री के. एस. जवाहर यांनी केलं आहे.

Beer healthy drinks; Legislative Legislation of Andhra Pradesh | बीअर आरोग्यदायी पेय; आंध्र प्रदेशच्या मंत्र्यांचं विधान

बीअर आरोग्यदायी पेय; आंध्र प्रदेशच्या मंत्र्यांचं विधान

Next

ऑनलाइन लोकमत

अमरावती, दि.5-  बीअर हे आरोग्यदायी पेय आहे. इतर मद्यांशी तुलना केली तर बीअरमध्ये अल्कोहोलचं प्रमाण कमी असतं. यामुळे बीअर विक्रीला प्रोत्साहन देण्याचं धोरण सरकारने निश्चित केलं आहे, असं वक्तव्य आंध्र प्रदेशचे उत्पादन शुल्कमंत्री के. एस. जवाहर यांनी केलं आहे. आंध्र प्रदेश राज्याने आखलेल्या नव्या मद्य धोरणाला महिलांनी विरोध दर्शवला आहे. तरीसुद्धा बिअर हे आरोग्यदायी पेय असल्याने बीअर विक्रीला प्रोत्साहान देणारं धोरण सरकार राबवणार आहे, असं त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट केलं आहे.
 
कोण म्हणतं बीअर आरोग्यदायी पेय नाही ? बीअर सगळ्यांच्या आरोग्यासाठी चांगलं पेय आहे, हे मी सिद्ध करायला तयार आहे, असं जवाहर यांनी सोमवारी संध्याकाळी एका वृत्तवाहिनीतील कार्यक्रमात म्हंटलं आहे. आंध्रप्रदेशचे उत्पादन शुल्कमंत्री के.एस.जवाहर यांची हे वक्तव्य असलेली व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पण हा व्हि़डीओ व्हायरल झाल्या नंतर जवाहर यांनी मात्र अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण त्यांनी संबंधित वृत्तवाहिनीकडे मंगळवारी सकाळी व्हॉट्सअॅप मेसेज पाठवून पाठवून बिअर आरोग्यास किती फायदेशीर आहे त्याबद्दलची माहिती दिल्याचं समजतं आहे.
 
कर्करोग, हृदयरोग, हाडांचे आजार यांसारख्या अनेक आजारांवर बीअर फायदेशीर ठरते, असं मत त्यांनी मांडलं आहे. तसंच माणसांच्या पचनसंस्थेचं कार्य नीट पार पडण्यासाठी बीअर परिणामकारक ठरते. इतकंच नाही, तर डायबिटीससाठीसुद्धी ती उपयुक्त आहे, असे बीअरचे १३ फायदे उत्पादन शुल्क मंत्र्यांनी सांगितले आहेत.  
 
बीअर जर आयोग्यदायी पेय आहे, तर त्याच्या विक्रीला लायसन्सची गरज काय? ते साध्या जनरल स्टोअरमध्येही विकता यायला हवं, अशी प्रतिक्रिया उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. 
 
आणखी वाचा :
 

कुर्रररर !!! मुलीचं नाव "जीएसटी"

 
 
आंध्र प्रदेशात १ जुलैपासून नव्या उत्पादन शुल्क धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे. महामार्गांच्या शहरातून जाणाऱ्या भागात मद्य विक्री करायला राज्य मंत्रिमंडळाने अधिसूचना जारी करत  परवानगी दिली आहे. नव्या उत्पादन शुल्क धोरणानुसार आंध्र सरकार आता परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी पर्यटन स्थळांच्या ठिकाणी २४ तास बिअर पार्लर सुरू करण्याच्या विचारात आहे.
 
दरम्यान, आंध्र प्रदेशातील काही महिला संघटनांनी जवाहर यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे, तसंच आंदोलन करण्याचा
इशाराही दिला आहे. 
 
 
 

आणखी वाचा :

दहशतवादाच्या दानवाला रोखण्याची गरज - मोदी

 

Web Title: Beer healthy drinks; Legislative Legislation of Andhra Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.