लष्कराची मोठी कारवाई, सहा महिन्यात 92 दहशतवादी ठार

By admin | Published: July 6, 2017 01:04 PM2017-07-06T13:04:14+5:302017-07-06T13:04:48+5:30

दहशतवादी विरोधी कारवाईत यावर्षी खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा आकडा 2012 आणि 2013 मधील वार्षिक आकडेवारीपेक्षाही जास्त आहे

Major military operations, 92 terrorists killed in six months | लष्कराची मोठी कारवाई, सहा महिन्यात 92 दहशतवादी ठार

लष्कराची मोठी कारवाई, सहा महिन्यात 92 दहशतवादी ठार

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 6 - काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी दहशतवाद्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली असून त्याचा प्रभावही दिसू लागला आहे. यावर्षी 2 जुलैपर्यंत जवानांनी जवळपास 92 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. 2016 मध्ये जुलैपर्यंतची आकडेवारी पहायला गेल्यास हा आकडा 79 इतका होता. दहशतवादी विरोधी कारवाईत यावर्षी खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा आकडा 2012 आणि 2013 मधील वार्षिक आकडेवारीपेक्षाही जास्त आहे. त्यावेळी युपीए सरकार सत्तेत होतं.
 
आणखी वाचा - 
जम्मू काश्मीर : AK-47सहीत टेरिटोरियल आर्मीचा जवान बेपत्ता
सिक्किमप्रश्नी कूटनीतीच्या माध्यमातूनच तोडगा, भारताची स्पष्ट भूमिका
 
लष्कराला मोठं यश 
जम्मू काश्मीरमध्ये 2012 रोजी 72 तर 2013 मध्ये 67 दहशतवादी ठार करण्यात आले होते. एनडीएच्या कार्यकाळात 2014 मध्ये हा आकडा वाढून 110 वर पोहोचला. 2015 मध्ये एकूण 108, तर 2016 मध्ये 150 दहशतवादी मारले गेले. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, "यावर्षी 2 जुलैपर्यंत ठार केल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या 2014 आणि 2015 मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या आकड्यापेक्षा थोडी कमी आहे". दहशतवाद्यांविरोधात करण्यात आलेल्या या चोख कारवाईचं श्रेय लष्कर, केंद्रीय दलं, राज्य सरकार आणि गुप्तचर यंत्रणांमधील उत्तम समन्वयाचं आहे. 
 
कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा 
यावर्षी 2 जुलैपर्यंत ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये अनेक कुख्यात दहशतवाद्यांचा समावेश आहे याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. गृहमंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिका-याने सांगितल्यानुसार, "सुरक्षा जवानांना खो-यात लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेऊन, त्यांचा खात्मा करण्यासाठी मोकळीक दिली आहे. दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरु करण्याआधी संपुर्ण प्लान तयार केला जातो. तसंच कमीत कमी नुकसान करुन दहशतवाद्यांना कसं ठार करता येईल याकडेही लक्ष दिलं जातं". 
 
दहशतवादी कारवायांमध्ये वाढ, घुसखोरींमध्ये घट
एकीकडे खो-यात ठार दहशतवाद्यांची संख्या वाढली असताना, दुसरीकडे घुसखोरी प्रकरणांमध्येही घट झाली आहे.2016 मध्ये घुसखोरीच्या एकूण 371 प्रकरणांची नोंद करण्यात आली. यावर्षी मे महिन्यापर्यंत हा आकडा कमी होऊन 124 वर आला होता. अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, या 124 प्रयत्नांमध्ये सामील असलेल्या अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. मात्र खो-यात दहशतवादी संबंधित घटनांमध्ये वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे. यावर्षी 2 जुलैपर्यंत दहशतवादाशी संबंधित 168 घटना घडल्या आहेत. 2016 मध्ये हाच आकडा 126 होता. जिथपर्यंत दगडफेकीचा प्रश्न आहे, त्यातही घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. 

Web Title: Major military operations, 92 terrorists killed in six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.