ट्राफिकमध्ये अडकल्याने BMW रस्त्यावर सोडून चोर फरार

By admin | Published: July 7, 2017 12:26 PM2017-07-07T12:26:38+5:302017-07-07T12:31:03+5:30

बीएमडब्ल्यू कार चोरी करुन पळ काढत असलेल्या चोराला वाहूतक कोंडीमुळे रस्त्यावरच कार सोडावी लागली

Thieves absconding in traffic trapped on BMW road | ट्राफिकमध्ये अडकल्याने BMW रस्त्यावर सोडून चोर फरार

ट्राफिकमध्ये अडकल्याने BMW रस्त्यावर सोडून चोर फरार

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - बीएमडब्ल्यू कार चोरी करुन पळ काढत असलेल्या चोराला वाहूतक कोंडीमुळे रस्त्यावरच कार सोडावी लागली. कार रस्त्यावरुन सोडून तो फरार झाला. या चोराने बुधवारी रात्री दिल्लीमधील कँट परिसरात एका लेफ्टनंट कर्नलच्या बीएमडब्ल्यू कारची चोरी केली होती. चोर करताना त्याने कँट परिसरातील ऑफिसर्स मेसचा गेटही तोडला होता. मात्र गेटमधून बाहेर पडताच रोडवर ट्राफिक जॅम असल्याचं दिसलं, आणि आपला प्लान फसल्याचं त्याच्या लक्षात आलं. शेवटी कार तिथेच सोडून त्याने पळ काढला. हा सर्व घटना तेथील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. पोलिसांनी चोराचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथकं निर्माण केली आहेत.

आणखी वाचा - 
अवघ्या 2 रुपयांत अजय सिंगनी विकत घेतली स्पाइसजेट विमान कंपनी
अजब प्रेमाची गजब गोष्ट ! 15 वर्षाचा नवरा आणि 73 वर्षांची वधू
सोनिका चौहान मृत्यू प्रकरणी अभिनेता विक्रम चॅटर्जीला अटक
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिनाकी बाणी असं या लेफ्टनंट जर्नलचं नाव आहे. ते दिल्लीमधील कँट परिसरात राहतात. त्यांच्याजवळ दोन कार आहेत. काही दिवसांपुर्वी त्यांनी आपली एका कार विकण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरता दिली होती. दोन ते तीन दिवसांपुर्वी एका व्यक्तीने आपल्याला कार खरेदी करायची असल्याचा फोन केला. यानंतर लेफ्टनंट कर्नलनी येऊन कार पाहण्यास सांगितलं. समोरील व्यक्तीने बुधवारी कार पाहण्याची इच्छा दर्शवली असता आपण दिवसा व्यस्त असून रात्री येण्यासाठी लेफ्टनंट कर्नलनी सांगितलं. 
 
यानंतर लेफ्टनंट कर्नल जात असलेल्या ठिकाणी आपण असल्याचं सांगत त्याने भेटण्याची इच्छा व्यक्त केली. नंतर लेफ्टनंट कर्नल त्याला आपल्या बीएमडब्ल्यू कारमधून कँट परिसरातील ऑफिसर्स मेसमध्ये घेऊन आले. त्यावेळी रात्रीचे 10 वाजले होते. 
 
यावेळी आरोपीने लेफ्टनंट कर्नल बाणी यांनी तुम्ही तुमची बीएमडब्ल्यू का विकत नाही असं विचारलं. आपण खरेदी करण्यास तयार असल्याचंही त्याने सांगितलं. मात्र त्यांनी नकार दिला. यानंतर आरोपीने आपण तुमची कार चालवून पाहू शकतो का विचारलं. लेफ्टनंट कर्नल बाणी यांनीही त्याच्यावर विश्वास ठेवत बीएमडब्ल्यूची चावी दिली. याचवेळी आरोपीने लेफ्टनंट कर्नल बाणी यांच्या डोळ्याच मिरची पावडर टाकली, आणि कार सुरु करुन पळ काढला. दरम्यान आरोपीने मेसचा लोखंडी गेटही तोडला आणि पळून जाण्याचा प्रयत्न करु लागला. पण गेटमधून बाहेर पडताच रोडवर ट्राफिक असल्याचं त्याने पाहिलं. मागून सुरक्षारक्षक आणि लेफ्टनंट कर्नल बाणी त्याचा पाठलाग करण्यासाठी धावत सुटले. आपली कोंडी झाल्याचं लक्षात येताच चोराने कार तिथेच सोडून पळ काढला. 
 
आरोपी पुर्ण तयारीनिशी आला होता असं पोलिसांचं म्हणणं आहे. कारण कारमध्ये सापडलेल्या त्याच्या बॅगमध्ये वेगवेगळ्या नंबर प्लेट्स सापडल्या आहेत. एका प्लेटवर तर पोलीस लिहिलं आहे. पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. 
 

Web Title: Thieves absconding in traffic trapped on BMW road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.