अमरनाथ हल्ल्याचा मुख्य सूत्रधार इस्माईलचं दोन वर्षांपासून भारतात वास्तव्य

By admin | Published: July 12, 2017 07:45 AM2017-07-12T07:45:46+5:302017-07-12T11:43:02+5:30

पाकिस्तानी नागरिक असणा-या अबू इस्माईलने दोन वर्षांपुर्वी सीमा ओलांडून भारतात घुसखोरी केली होती

Ismail, who is the main architect of the Amarnath attack, will live in India for two years | अमरनाथ हल्ल्याचा मुख्य सूत्रधार इस्माईलचं दोन वर्षांपासून भारतात वास्तव्य

अमरनाथ हल्ल्याचा मुख्य सूत्रधार इस्माईलचं दोन वर्षांपासून भारतात वास्तव्य

Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 12 - अमरनाथ यात्रेकरुंवर हल्ला करुन सात जणांचा मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद अबू इस्माईलसाठी शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. लष्कर-ए-तोयबाने हा भीषण दहशतवादी हल्ला केला असून, अबू इस्माईल या हल्ल्याचा मास्टमाईंड असल्याचा संशय आहे. गेल्या 26 वर्षातील आतापर्यंतचा हा सर्वात भीषण हल्ला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी नागरिक असणा-या अबू इस्माईलने दोन वर्षांपुर्वी सीमा ओलांडून भारतात घुसखोरी केली होती. त्यानंतर दक्षिण काश्मीरमध्ये लष्कराचा स्थानिक कमांडर म्हणून काम करत होता. 
 
संबंधित बातम्या
दहशतवादी संदीपचा भाऊ म्हणतो "त्याला गोळ्या घाला"
अमरनाथ यात्रा हल्ला; बस चालक सलीमच्या प्रसंगावधानामुळे वाचले अनेकांचे प्राण
अबू इस्माईलच हल्ल्याचा सूत्रधार
 
अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याचा तपास सुरु करण्यात आला आहे. नुकतीच तपासाला सुरुवात केली गेली असल्याने ठोस असे काही पुरावे हाती आलेले नाहीत. मात्र सुरक्षा यंत्रणांनी जी माहिती गोळा केली आहे, त्यानुसार अबू इस्माईलने तीन ते पाच दहशतवाद्यांसोबत हा हल्ला केल्याचं सिद्ध होत आहे. 
 
दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली असतानाही बसला सेक्युरिटी चेक पोस्टवरुन जाण्याची परवानगी कशी काय देण्यात आली याबाबत अद्याप स्पष्टता नाही. जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी सांगितलं आहे की, "खूप मोठी त्रुटी आहे. सुर्यास्तानंतर बसला परवानगी देण्यात आली...असं का करण्यात आलं याचा तपास केला जाईल". घटनास्थळी 100 हून जास्त मोकळी काडतूसं सापडली आहे. यावरुन दहशतवाद्यांनी हल्ल्याचा कट आधीच रचल्याचं सिद्ध होत आहे. 
 
मुख्य हल्लेखोर इस्माईल पाकिस्तानी नागरिक असून, तो व पाकिस्तानीच असलेला अबू दुजाना याआधीही काश्मीरमधील अनेक अतिरेकी हल्ल्यांमध्ये सहभागी झाले आहेत. अबू इस्माईलसोबत जे दोघे होते, त्यांची ओळख पटली असून, जे त्यांना हल्ल्याच्या ठिकाणी घेऊ न आले आणि ज्यांनी शस्त्रे आणून दिली, त्यांचा आम्ही शोध घेत आहोत. हल्ल्यानंतर दहशतवादी कोणत्या दिशेने गेले, हे समजले असून, त्यांना लवकरच अटक होईल, असे जम्मू-काश्मीरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
 
हल्ला करणाऱ्यांमध्ये अबू इस्माईल सहभागी होता, असे काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी सांगितले. ते म्हणाले की, हा हल्ला तैयबानेच केला. त्याची जबाबदारी अबू इस्माईलवर होती. त्याला स्थानिक दहशतवाद्यांनीही मदत केली, असेही मुनीर खान यांनी स्पष्ट केले. तैयबाने मात्र हल्ल्याचा निषेध केला. हा हल्ला इस्लामविरोधी आहे, अन्य धर्मीयांवर हल्ला वा हिंसाचार हे इस्लामला मान्य नाही, असे तैयबाचा प्रवक्ता अब्दुल्ला गझनवीने म्हटले आहे. मात्र याआधी अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या पाच हल्ल्यांमध्ये तयबाचाच हात होता.
 
सध्या थंड पडलेल्या जैश-ए-महमद या संघटनेला सक्रिय करण्यासाठीही तयबा प्रयत्नशील आहे. तयबाने स्थानिकांना जाळ्यात खेचण्याचे प्रयत्न चालविले आहेत. दक्षिण काश्मीरमध्ये ३0 स्थानिक जण तैयबामध्ये सहभागी झाले असून, उत्तर काश्मीरमध्ये ८0 पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय आहेत.
 

 

Web Title: Ismail, who is the main architect of the Amarnath attack, will live in India for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.