अमरनाथ यात्रा हल्ला: पीडीपी आमदाराच्या ड्रायव्हरला अटक

By admin | Published: July 15, 2017 09:56 AM2017-07-15T09:56:45+5:302017-07-15T10:12:14+5:30

अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्यांच्याच एका जवानाला अटक करण्यात आली आहे.

Amarnath Yatra attack: PDP MLA arrested for driver | अमरनाथ यात्रा हल्ला: पीडीपी आमदाराच्या ड्रायव्हरला अटक

अमरनाथ यात्रा हल्ला: पीडीपी आमदाराच्या ड्रायव्हरला अटक

Next

ऑनलाइन लोकमत

श्रीनगर. दि. 15- अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी त्यांच्याच एका जवानाला अटक करण्यात आली आहे. पीडीपीचे आमदार एजाज अहमद मीर यांच्या गाडीवर तो जवान ड्रायव्हर म्हणून तैनात आहे. अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याप्रकरणी या ड्रायव्हरची कसून चौकशी केली जाते आहे. पुलवामामध्ये तौसीफ अहमद असं या ड्रायव्हरचं नावं असून तो पुलवामामध्ये राहणारा आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे.
 
हा ड्रायव्हर दहशतवादाच्या प्रकरणाशी संबंधित असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सुत्रांच्या माहितीनूसार या हल्ल्याप्रकरणी आणखी दोन जणांनाही अटक करण्यात आली आहे. सात महिन्याआधी तौसीफला जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सिक्युरिटी विंगमधून हटवून आमदाराच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून तैनात करण्यात आलं होतं. तौसीफच्या दहशतवादाशी संबंधीत काही लिंक समोर आल्याने त्याची चौकशी केली जाते आहे, असं पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी सांगितलं आहे. अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्याच्या तपासणीसाठी शुक्रवारी एसआयटीच्या सहा जणांची टीम तयार करण्यात आली आहे.
आणखी वाचा
 

यूपी विधानसभा स्फोटकं प्रकरणी NIAचा तपास सुरू

UPA सरकारला सरसंघचालकांचं नाव दहशतवाद्यांचं यादीत टाकायचं होतं?

जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये 10 जुलै रोजी रात्री दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला तर 21 जण जखमी झाले. मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोन महिला भाविक आणि गुजरातमधील 5 भाविकांचा समावेश आहे.

 
कसा झाला हल्ला?
 
सोमवारी (11 जुलै ) ज्या बसने हे यात्रेकरू निघाले होते, ती मुख्य यात्रेचा भाग नव्हती आणि अमरनाथ देवस्थान बोर्डाकडे त्या बसची नोंदही नव्हती. त्यामुळे त्या बसला केंद्रीय राखीव पोलीस दलाची सुरक्षा पुरवण्यात आली नव्हती. बस अनंतनाग जिल्ह्यातून जात असताना रात्री 8 वाजून 20 मिनिटांनी दहशतवाद्यांनी तिच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. त्या गोळीबारात सहा जण जागीच तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला.
ही बस सोनमर्गहून आली होती. अमरनाथांचे दर्शन घेतल्यानंतर याचमार्गे यात्रेकरू जम्मूच्या मार्गावर होते. रात्री सात वाजेनंतर महामार्गावर यात्रेकरूंचे वाहन चालविण्याची परवानगी नाही. असे स्पष्ट निर्देश असताना यात्रेकरूंसाठी असलेल्या वाहतूक नियमांचे बसचालकाने उल्लंघन केले, असा दावा पोलिसांनी केला आहे.
यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी जम्मूतील यात्रेकरूंच्या तळापासून ते काश्मीरमधील पहलगाम किंवा बाल्टालस्थित यात्रेकरूंचा तळ एसओजी आणि सीआरपीएफच्या निगराणीखाली असतो. वाहन नोंदणीकृत नसताना ही बस अमरनाथपर्यंत कशी गेली; हे मोठे गौडबंगाल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्याशी संपर्क साधून हल्ल्याचा तपशील मागवला
 

Web Title: Amarnath Yatra attack: PDP MLA arrested for driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.