विधानसभा निवडणुकीआधी गुजरात काँग्रेसमध्ये फाटाफूट ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 11:02 AM2017-07-21T11:02:32+5:302017-07-21T11:02:32+5:30

गुजरातमध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणूका होणार असून, त्याआधी काँग्रेसला एक मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

Before the Vidhan Sabha elections, the Gujarat Congress disrupted? | विधानसभा निवडणुकीआधी गुजरात काँग्रेसमध्ये फाटाफूट ?

विधानसभा निवडणुकीआधी गुजरात काँग्रेसमध्ये फाटाफूट ?

Next

 ऑनलाइन लोकमत 

सूरत, दि. 21 - गुजरातमध्ये येत्या नोव्हेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणूका होणार असून, त्याआधी काँग्रेसला एक मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मागच्या काही काळापासून काँग्रेसमध्ये नाराज असलेले माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला आज 77 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा करु शकतात. शंकर सिंह वाघेला यांच्यासोबत प्रदेश काँग्रेसमधील त्यांचे समर्थकही बाहेर पडल्यास प्रत्यक्ष निवडणुकीआधीच काँग्रेसमध्ये फाटाफूट होईल. 
 
शंकर सिंह वाघेला भाजपामधून फुटून बाहेर पडल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय जनता पार्टीची स्थापना केली होती. 17 वर्षांपूर्वी त्यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. शुक्रवारी आपला वाढदिवस साजरा करण्याच्या निमित्ताने त्यांनी गांधीनगर येथील हॉलमध्ये समर्थकांचा मेळावा आयोजित केला आहे. या कार्यक्रमात ते आपल्या भविष्यातील राजकीय वाटचालीची घोषणा करु शकतात. वाघेला यांच्यासोबत त्यावेळी फुटून बाहेर पडलेले काही आमदार पुन्हा भाजपामध्ये जाण्यास इच्छुक आहेत. 
 
आणखी वाचा 
 
जर असे घडले तर, काँग्रेसचा तोटा आणि काही प्रमाणात भाजपाचा फायदा होऊ शकतो. शंकर सिंह वाघेला राष्ट्रवादी काँग्रेस, संयुक्त जनता दल, आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोरे, जिगनेश मेवानी या तरुण नेत्यांना सोबत घेऊन तिस-या आघाडीची स्थापना करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
 
आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून नाव जाहीर करावे अशी वाघेला यांची मागणी होती. पण काँग्रेस नेतृत्वाने त्यांची मागणी फेटाळून लावल्याने ते नाराज आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याबरोबर झालेली शेवटची बैठक निष्फळ ठरली होती. सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून नाव जाहीर करणे शक्य नसल्याचे वाघेला यांना स्पष्ट केले. काँग्रेसच्या नेत्यांना ते पटणार नाही असे त्यांना सांगण्यात आले. 
 
गुजरात: शहरात भाजपा तर गावात काँग्रेस यशस्वी
दोनवर्षांपूर्वी गुजरातमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने महत्वाच्या महानगरपालिका आपल्याकडे कायम राखण्यात यश मिळवल तर, ग्रामीण गुजरातमध्ये भाजपची पिछेहाट झाली. ब-याच वर्षानंतर काँग्रेसने येथे पूनरागमन केले. 
 
 

Web Title: Before the Vidhan Sabha elections, the Gujarat Congress disrupted?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.