पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, एक जवान शहीद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2017 08:35 PM2017-08-08T20:35:13+5:302017-08-08T22:17:29+5:30
जम्मू-काश्मीरमधील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे.
जम्मू-काश्मीर, दि. 8 - जम्मू-काश्मीरमधील कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णा घाटी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तान लष्कराकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला आहे. दरम्यान, पाकिस्तान लष्कराकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला भारतीय लष्कराच्या चोख प्रत्त्यूत्तर दिले आहे.
{{{{twitter_post_id####
J&K: An Army jawan has lost his life in ceasefire violation by Pakistan in KG sector pic.twitter.com/VfoJkJCiwQ
— ANI (@ANI) August 8, 2017
गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे दहशवाद्यांचे घुसखोरीचे प्रयत्न सुरु आहेत. दोन दिवसांपूर्वी काश्मीरमधल्या माचिल सेक्टर सीमेपलिकडून घुसखोरी करणा-या 5 दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराच्या जवानांनी खात्मा केला. तसेच, दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. तत्पूर्वी जवानांनी दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यातील पांपोर भागातल्या संबुरा गावात कारवाई करत एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. ठार करण्यात आलेला दहशतवादी अबू इस्माइल समूहाशी संबंधित होता. तो दहशतवादी पाकिस्तानातून आला होता. तसेच त्याचे नाव उमेर होते. जवानांनी ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून एके 47 रायफल्स जप्त केली.
}}}}J&K: Photo of Sepoy Pawan Singh Sugra, who lost his life in ceasefire violation by Pakistan in KG sector. Sugra is from Uttarakhand. pic.twitter.com/J4ZcnL0qbc
— ANI (@ANI) August 8, 2017