मोदींच्या 'डीएनए' वक्तव्यावर नीतिश कुमारांचा 'शब्द वापसी'ने पलटवार
By admin | Published: August 10, 2015 10:51 AM2015-08-10T10:51:28+5:302015-08-10T11:11:45+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांना उद्देशून केलेले डीएनएच्या वक्तव्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी बिहारमध्ये 'शब्द वापसी' अभियान राबवण्यात येणार आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
पाणटा, दि. १० - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांना उद्देशून केलेले डीएनएचे वक्तव्यावर पलटवार करण्यासाठी नीतिश कुमार सिद्ध झाले आहेत. नीतिश कुमार हे लालू प्रसाद यादव यांच्यासह 'शब्द वापसी' अभियान सुरू करणार असून त्याअंतर्गत राज्यातील नागरिकांची स्वाक्षरी मोहिम राबवण्यात येणार आहे.
गेल्या बिहार भेटीत मोदींनी 'डीएनए'वरून नीतिश कुमार यांना डिवचले होते तर काल गया येथील सभेत त्यांनी बिहारला 'बिमारू राज्य' संबोधल्यामुळे नीतिश कुमार व लालू प्रसाद त्यांच्यावर तुटून पडले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मोदींवर पलटवार करण्यासाठी राज्यात हे 'शब्द वापसी' अभियान राबवण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी ही माहिती दिली असून
या अभियानाअंतर्गत स्वाक्षरी मोहिम घेण्यात येणार असून राज्यातील ५० लाख नागरिक सह्या करून 'पंतप्रधानांनी त्यांचे वक्तव्य मागे घ्यावे' अशी मागणी करणार आहेत. तसेच या शब्दवापसी मोहिमेत सह्या करणारे नागरिक मोदींना आपले डीएनए सँपल्सही पाठवणार असून त्याची तपासणी करण्याचीही मागणी करण्यात येणार आहे, असे नीतिश कुमार यांनी सांगितले.
या अभियानासंदर्भात नीतिश कुमार व लालू प्रसाद यादव हे दोघे उद्या संयुक्त पत्रकार परिषद घेणार आहेत. येत्या २९ ऑगस्ट रोजी पाटण्यातील गांधी मैदानात 'स्वाभिमान रॅलीसह' 'शब्द वापसी अभियाना'चा पहिला टप्पा पार पडेल, असेही नीतिश कुमार यांनी सांगितले.