...अखेर गीता पाकिस्तानातून भारतात सोमवारी परतणार

By admin | Published: October 24, 2015 03:05 AM2015-10-24T03:05:49+5:302015-10-24T03:05:49+5:30

पंधरा वर्षांपूर्वी अपघाताने सीमा पार करून पाकिस्तानमध्ये गेलेल्या भारतीय गीताला आता २६ आॅक्टोबर रोजी भारतात परत आणण्यात येणार आहे.

... finally Gita returns to India from Pakistan on Monday | ...अखेर गीता पाकिस्तानातून भारतात सोमवारी परतणार

...अखेर गीता पाकिस्तानातून भारतात सोमवारी परतणार

Next

नवी दिल्ली : पंधरा वर्षांपूर्वी अपघाताने सीमा पार करून पाकिस्तानमध्ये गेलेल्या भारतीय गीताला आता २६ आॅक्टोबर रोजी भारतात परत आणण्यात येणार आहे.
इधी फाऊं डेशन या धर्मादाय संस्थेचे पाच अधिकारी गीतासोबत भारतात येणार आहेत.’ ‘गीता २६ आॅक्टोबर रोजी भारतात परत येईल. तिच्यासमवेत इधी फाऊंडेशनचे पाच सदस्य असतील आणि या सदस्यांना भारतात सरकारी अतिथी म्हणून सन्मान दिला जाईल,’ असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी शुक्रवारी सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गीताने तिला इस्लामाबादेतील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातर्फे पाठविण्यात आलेल्या छायाचित्रावरून भारतातील आपले पिता, सावत्र आई आणि भावंडांना ओळखले आहे. गीताचे हे कुटुंबीय बिहारमध्ये वास्तव्याला आहे. पंधरा वर्षांपूर्वी पाकिस्तानी रेंजर्सना लाहोर रेल्वेस्थानकावर आलेल्या समझोता एक्स्प्रेसच्या एका डब्यात गीता एकटीच बसलेली आढळली होती. पोलिसांनी तिला लाहोरमधील इधी फाऊं डेशनच्या स्वाधीन केले होते आणि नंतर तिला कराचीला नेण्यात आले होते. गीताची भेट घ्या आणि तिच्या कुटुंबियांना शोधण्याचा प्रयत्न करा, असे निर्देश परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिल्यानंतर आपण गेल्या आॅगस्टमध्ये गीताची भेट घेतली होती, असे पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त टी. सी. ए. राघवन यांनी म्हटले आहे.


डीएनए चाचणी करणार
गीता भारतात आल्यानंतर तिच्या पालकांची डीएनए चाचणी करण्याची सरकारची योजना आहे. तिने ओळखलेल्या पालकांसोबत तिचा डीएनए जुळला तर तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: ... finally Gita returns to India from Pakistan on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.