आता ‘अच्छे दिन’ म्हणताच लोक हसतात-राहुल गांधी

By admin | Published: November 23, 2015 11:46 PM2015-11-23T23:46:54+5:302015-11-23T23:46:54+5:30

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करीत त्यांच्यावर उपरोधिक टीका केली.

Now, as people say 'good days', people laugh- Rahul Gandhi | आता ‘अच्छे दिन’ म्हणताच लोक हसतात-राहुल गांधी

आता ‘अच्छे दिन’ म्हणताच लोक हसतात-राहुल गांधी

Next

सहारनपूर (उ.प्र.) : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करीत त्यांच्यावर उपरोधिक टीका केली. आता ‘अच्छे दिन’ म्हणताच, लोक हसायला लागतात, असे ते म्हणाले. मोदींच्या विदेशवारीवरही त्यांनी हल्ला चढवला.
उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी राहुल यांनी संवाद साधत पदयात्रा काढली. त्यांच्या पदयात्रेत शेकडो लोक सहभागी झाले. यावेळी ठिकठिकाणी थांबत त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा व समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी मोदींवर सडकून टीका केली. पंतप्रधान विदेश दौरे करण्यात व्यस्त आहेत. कधी इंग्लंडला, कधी मलेशियाला, तर कधी अमेरिकेला त्यांचे दौरे सुरू असतात. मोदी विदेशवाऱ्यांसाठी उड्डाण भरत असताना हा राहुल गांधी मात्र तुमच्या शेतात तुमच्यासोबत उभा आहे, असे ते म्हणाले. मोदींनी ‘अच्छे दिन’चा नारा दिला होता. भारत बदलून दाखवेल, असे ते म्हणाले होते. पण आता मोदींना स्वत:लाही ‘अच्छे दिन’चा नारा आठवत नाही. (वृत्तसंस्था)

Web Title: Now, as people say 'good days', people laugh- Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.