चार महिन्यांत जिल्ह्यात ४५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Published: April 24, 2016 11:04 PM2016-04-24T23:04:00+5:302016-04-24T23:15:06+5:30

अहमदनगर : सततची नापिकी, कोलमडलेले आर्थिक नियोजन आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर, यामुळे गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यातील ४५ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे़

45 farmers suicides in the district in four months | चार महिन्यांत जिल्ह्यात ४५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

चार महिन्यांत जिल्ह्यात ४५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Next

अहमदनगर : सततची नापिकी, कोलमडलेले आर्थिक नियोजन आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर, यामुळे गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यातील ४५ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे़ त्यापैकी २५ आत्महत्याग्रस्त शेतकरी सरकारी मदतीस पात्र ठरले तर ११ आत्महत्याग्रस्तांच्या फेरचौकशीचे आदेश प्रशासनाने दिले आहेत़ सर्वाधिक आत्महत्या गेल्या चार महिन्यांत झाल्याचे अहवालावरून समोर आले आहे़
गेल्या दोन वर्षांत जिल्ह्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढली आहे़ सन २००३ पासून जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे, ते अद्याप थांबलेले नाही़ मागील वर्षी ११७ शेतकऱ्यांनी मृत्युला जवळ केले़ चालू वर्षात कमी पाऊस पडला़ त्यामुळे खरीप व रब्बी हंगाम वाया गेला़ त्यावर केलेल्या गुंतवणुकीवर पाणी फिरले़ बळीराजा कर्जबाजारी झाला आहे़ त्यामुळे दररोजचा खर्च भागविणेही कठीण होऊन बसले़ जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार जानेवारी, फेबु्रवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये ४५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या़ त्यापैकी २५ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात आली आहे़
जिल्ह्यात कधी नव्हे ती भीषण स्थिती निर्माण झाली आहे़ खरीप व रब्बी हंगामातील पैसेवारीच्या अहवालावर नजर टाकल्यास संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या छायेखाली आल्याचे प्रकर्षाने जाणवते़ विशेष म्हणजे उत्तर नगर जिल्ह्यात यंदा बिकट स्थिती निर्माण झाली़ धरणांत पाणी असून, ते शेतीला मिळाले नाही़ मुळा व भंडारदरा धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले़ त्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेती उद्ध्वस्त झाली़ दक्षिण नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या कुकडी प्रकल्पातूनही यंदा पाणी मिळाले नाही़ त्यामुळे लाभक्षेत्रातील फळबागा झळून खाक झाल्या़
त्यामुळे बळीराजावर आर्थिक संकट ओढावले़ यातून निर्माण झालेल्या नैराश्येतून आत्महत्यासारखा विखारी मार्ग शेतकऱ्यांनी अवलंबिला़ घरातील कर्ता माणून न राहिल्याने संसार उघड्यावर आले असून, प्रशासनाकडून याबाबत ठोस उपाययोजना हाती घेतल्या गेल्या नाहीत, हे विशेष़
(प्रतिनिधी)
३६५ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
गेल्या २००३ ते एप्रिल २०१६ या काळात जिल्ह्यातील ३६५ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे़ त्यापैकी ४५ शेतकऱ्यांनी गेल्या चार महिन्यांत आत्महत्या केल्या असून, त्यापैकी २५ शेतकऱ्यांनी कर्जापायी आत्महत्या केल्याचे प्रशासनाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे़ त्यांच्या नातेवाईकांना सरकारी मदतही वितरीत करण्यात आली आहे़

Web Title: 45 farmers suicides in the district in four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.