ऑनलाइन शॉपिंग करताय.जरा सांभाळून

By admin | Published: March 28, 2017 01:56 PM2017-03-28T13:56:21+5:302017-03-28T13:56:21+5:30

ऑनलाइन शॉपिंग करताय, मग जरा सांभाळून कारण तुमच्या ऑनलाइन शॉपिंगवर सायबर चोरटे नजर ठेवून आहेत.

Shopping online | ऑनलाइन शॉपिंग करताय.जरा सांभाळून

ऑनलाइन शॉपिंग करताय.जरा सांभाळून

Next

 सायबर क्राईम : फसव्या फोन कॉलपासून सावध राहण्याचा प्रशासनाचा सल्ला 

नंदुरबार दि.28- ऑनलाइन शॉपिंग करताय, मग जरा सांभाळून कारण तुमच्या ऑनलाइन शॉपिंगवर सायबर चोरटे नजर ठेवून आहेत. सर्वाधिक ऑनलाइन शॉपिंग करणा:या ग्राहकांना फोन करून तुम्हाला लकी ड्रॉ लागला असल्याचे सांगत तुमचा बँक अकाउंट नंबर मिळवत तुमच्या बँक खात्यातून रक्कम गायब करणारी टोळी नंदुरबार शहरात सक्रिय झाली आह़े
शहरातील अनेक नागरिकांकडून अशा तक्रारी येत आह़े नागरिकांना त्यांच्या मोबाइलवर संबंधित  कंपनीचा प्रतिनिधी बोलत असल्याचा फसवा फोन येत आह़े सुरुवातीला आपण किती वर्षापासून याच  कंपनीचे सीम वापरत आहात? याचा नेटवर्कला काही समस्या आहे काय? आदी गुळगुळीत प्रश्न विचारून ग्राहकांना हेरण्यात येत  आह़े मग तुम्हाला अमूक रकमेचा लकी ड्रॉ लागला असल्याचे सांगत यासाठी तुमचा बँक अकाउंट नंबर किंवा एटीएम नंबर विचारण्यात  येत आह़े ग्राहकही त्यावर विश्वास ठेवून आपला बँक अकाउंट नंबर  किंवा एटीएम नंबर तसेच एटीएमचा पीन नंबरही लागलीच मागण्यात  येतो़ त्यानंतर चोरटय़ांनी नंबरवर एंटर मारल्यास ग्राहकाच्या रजिस्ट्रर केलेल्या नंबरवर ओटीपी नंबर येतो, तोदेखील चोरटय़ांकडून मागण्यात येतो़ त्यानंतर जे होते ते  सर्व थक्क करणारेच आह़े चोरटे  त्या ओटीपी नंबरच्या सहायाने ग्राहकांच्या बँक खात्यावर असलेल्या सर्व रकमेची स्वत:च ऑनलाइन शॉपिंग करून सर्व पैशांची विल्हेवाट लावतात़ याचा ग्राहकाला थांगपत्ताही लागत नाही़ ज्या वेळी ग्राहक आपल्या बँक अकाउंटची तपासणी करतो, तेव्हाच त्याला याची जाणीव होत असत़े मात्र त्यानंतर त्याच्या हाती काहीच शिल्लक नसत़े
या सायबर चो:यांमध्ये मुख्यत्वेकरून झारखंड राज्यातील जामतारा येथील टोळी सक्रिय आहे. यामध्ये त्यांचा हातखंडा असल्याचे सांगण्यात येत आह़े आतार्पयतच्या सायबर चो:यांच्या घटनांमध्ये जामतारा येथील टोळक्यांचा समावेश असल्याचे  स्पष्ट झाले आह़े यासाठी त्यांना संबंधित परिसरात प्रशिक्षण दिले जात असल्याचीही माहिती सूत्रांकडून मिळाली आह़े  
फसवणुकीचा दुसरा प्रकार म्हणजे अनेक वेळा ग्राहकांना अपरिचित नंबरवरून फोन करण्यात येत आह़े त्यात एक महिला केवळ हॅलो म्हणून फोन बंद करीत आह़े अनेक वेळा ग्राहकांकडून त्या नंबरवर पुन्हा फोन करण्यात येता़ फोन करताच ग्राहकांच्या मोबाइलवरील सर्व शिल्लक बॅलेन्स संपत असल्याचेही अनेक प्रकार शहरात घडत आह़े 

Web Title: Shopping online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.