पथनाटय़ातून दिला ‘कॅन्सरला कॅन्सल करा’चा संदेश
By admin | Published: April 22, 2017 12:41 PM2017-04-22T12:41:07+5:302017-04-22T12:41:07+5:30
शनिवारी जळगाव बसस्थानक, रेल्वे स्थानक येथे पथनाटय़ सादर करून कर्करोगाचे निदान, उपचार या बाबत जनजागृती करण्यात आली.
जळगाव, दि. 22 - ‘लोकमत’ आणि कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल यांच्यावतीने सखी मंच सदस्यांसाठी कर्करोगासंबंधी माहिती देणा:या ‘कॅन्सरला कॅन्सल करा’ या परिसंवादाचे 23 एप्रिल रोजी आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी शनिवारी जळगाव बसस्थानक, रेल्वे स्थानक येथे पथनाटय़ सादर करून कर्करोगाचे निदान, उपचार या बाबत जनजागृती करण्यात आली.
या वेळी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहून माहिती जाणून घेतली. या पथनाटय़ास भरघोस प्रतिसाद मिळाला.
‘लोकमत’ने कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाच्या साथीने कर्करोगाबद्दल जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. कर्करोगाचे लवकर निदान झाल्यास तो बरा होऊ शकतो, हे समजावून या घातक आजाराबाबत लोकांच्या मनात रुजलेली भीती कमी करण्यासाठी याअंतर्गत विशेष प्रय} केले जाणार आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी या पथनाटय़ाचे आयोजन करण्यात आले होते.